Saturday, April 27, 2024
Homeनाशिकअन्न व औषध प्रशासन कडून भगर व मिठाई उत्पादकांची कार्यशाळा

अन्न व औषध प्रशासन कडून भगर व मिठाई उत्पादकांची कार्यशाळा

सातपूर ।प्रतिनिधी

नाशिक येथे नाशिक जिल्ह्यातील भगर उत्पादक,घाऊक विक्रेते तसेच मिठाई उत्पादकांसाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
सदर कार्यशाळेचे आयोजन अन्न व औषध प्रशासन कडून करण्यात आले.या कार्यशाळेला नाशिक जिल्ह्यातील भगर उत्पादक तसेच मिठाई उत्पादक मोठया संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

सर्व प्रथम अन्न सुरक्षा अधिकारी सागर तेरकर यांनी प्रास्ताविक केले.त्यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ ची मूलभूत तत्वे विषद केली. त्या नंतर अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी भगर या धान्याचे प्रकार, त्यातून होणारे संभाव्य विषबाधेचे प्रकार, विषबाधा टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबतीत सविस्तर सादरीकरण केले.

नाशिक जिल्हा भगर मिल असोसिएशन चे अध्यक्ष महेंद्र छोरिया यांनी जिल्ह्यातील भगर उत्पादक हे चांगल्याच उत्पादन पद्धतीचा अवलंब करीत असल्याचे सांगितले. यापुढेही आपल्या संघटनेचे सदस्य अजून चांगल्या उत्पादन पद्धतीचा अवलंब करतील असे आश्वासन दिले.

मिठाई उत्पादक संघटनेचे अध्यक्ष मनोज कोतकर यांनी सुट्या मिठाई बाबत भारतीय अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाने जारी केलेल्या उत्पादन दिनांक तसेच सर्वोत्तम दिनांकबाबतच्या आदेशाचे पालन केले जाईल असे सांगितले. शेवटी अन्न सुरक्षा अधिकारी दिलीप सोनवणे यांनी सर्वांचे आभार मांडले. सह आयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी सर्वाना सविस्तर मार्गदर्शन करून त्यांचे शंकाचे निरसन केले.

निकृष्ट भगर व निकृष्ट मिष्टान्नांच्या माध्यमातून विषबाधेच्या बाबी समोर आल्या होत्या. त्या अनुषंगाने असे कटू प्रसंग पून्हा उद्भवू नये यासाठी भगर उत्पादकांना जागरुग करण्याच्या उद्देशाने कार्यशाळेद्वारे प्रबोधन करण्यात आले. उत्पादकांनी आपल्या उत्पादनांची गुणवत्त स्वत:च तपासून घ्यावी अन्यथा कंठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. सोबतच मिष्टान्नाबाबतच्या नव्या नियमांची माहीती व्यवसायीकांना देण्यात आली.प्रत्येकाने त्यांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.
चंद्रशेखर साळूंखे( सह आयुक्त ,अन्न व औषध प्रशासन)

- Advertisment -

ताज्या बातम्या