Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वरपासून जलसाक्षरता यात्रा; उज्जैन येथे राष्ट्रीय जलसंमेलन

त्र्यंबकेश्वरपासून जलसाक्षरता यात्रा; उज्जैन येथे राष्ट्रीय जलसंमेलन

नाशिक । प्रतिनिधी

गोदावरी नदी प्रदूषणमुक्त, पुनरुज्जीवित व प्रवाहित करण्यासाठी ४ फेबुवारी २०२० रोजी त्र्यंबकेश्वर येथून तिच्या उगमापासून जलसाक्षरता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेश या तीन राज्यातून जाऊन आंध्र प्रदेश राजमुंद्री येथे संगमावर यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.

- Advertisement -

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील क्षिप्रा नदीकिनारी दि. १६ ते १८ डिसेंबरपर्यंत तीन दिवसीय राष्ट्रीय जलसंमेलन झाले. त्यात याबाबतची दिशा ठरवण्यात आली. या यात्रेत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह हे तीनही राज्यात उपस्थित राहणार आहेत. या तीनही राज्यातील शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. तसेच गोदावरी नदी प्रवाहित करणार्‍या ज्या उपनद्या आहेत

त्यांच्यासोबत काम करणार्‍या संस्था, संघटनांना सोबत घेऊन या यात्रेचा १६ फेब्रुवारी २०२० रोजी राजमुंद्री येथील संगमाजवळ समारोप केला जाणार आहे. या यात्रेत गोदावरी गटारीकरणविरोधी मंच नाशिकचे अध्यक्ष निशिकांत पगारे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित, तेलंगणा जलसंपदा विकास महामंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव, प्रोफेसर कोट्टी, रमेश, बी. जनसेवा पार्टीचे जनरल सेक्रेटरी सत्यनारायण, आमदार बी. आर. पाटील, ओरिसा येथील बतेंद्री जेना, नाशिक येथील योगेश बर्वे व आनंद कावळे आदी सदस्य या यात्रेचे आयोजन करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या