Type to search

Featured नाशिक

‘व्हीटीएस’मुळे एसटी बसेसची चौकशी सुलभ

Share
नाशिक | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यभरात ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम प्रकल्प’ राबवण्यात येत असून, त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. बसप्रवासी कोणत्याही बसथांब्यावर उभा असल्यास त्याला हवी असलेली गाडी कधी येणार याची माहिती मिळून मदत केंद्रांवर वारंवार चौकशीची गरज पडणार नाही व बसेसची वेळ व ठिकाणांची सुयोग्य माहिती मिळणार आहे.
या व्हीटीएस यंत्रणेमुळे प्रवाशांना ऑनलाईन बुकिंगसह बसचे ठिकाण, वेग, रिक्त आसने यांची योग्य माहिती मिळेल. त्यामुळे प्रवासाचे अचूक नियोजन करणे सोपे होणार आहे. स्थानकांमध्ये डिस्प्लेची सोय असल्यामुळे प्रवाशांना येणार्‍या जाणार्‍या बसेसची माहिती वेळोवेळी मिळणार आहे.
बसमध्ये ही यंत्रणा बसवण्यासाठी सॉफ्टवेअरसह अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच मोबाइल ऍपही लवकरच विकसित करण्यात येणार आहे. मोबाईल ऍपमुळे प्रवाशांना कोणत्याही ठिकाणी या यंत्रणेद्वारे माहिती घेता येणार आहे.
‘व्हीटीएस’मुळे प्रवाशांनादेखील गाडीची योग्य माहिती मिळणार आहे. व्हीटीएसमुळे मदत केंद्र तसेच एसटी कर्मचार्‍यांवर येणारा अतिरिक्त ताणही हलका होईल. बसेसंमध्ये व्हीटीएस यंत्रणा बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!