Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जिल्ह्यात दीड लाख मतदारांची पडताळणी पूर्ण; कासवगतीने मोहीम सुरु; दीड महिन्यांची मुदतवाढ

Share

नाशिक । प्रतिनिधी

निवडणूक आयोगाच्या निदेर्र्र्र्र्र्र्र्शानूसार जिल्ह्यात मतदार पडताळणीचे काम सुरु आहे. २० डिसेंबरपर्यंत जिल्हयातील १५ मतदारसंघातील ४५ मतदारांची पडताळणी करण्याचे टार्गेट होते. मात्र,जिल्ह्यासह राज्यात हे काम अतिशय कासवगतीने सुरु आहे. ते बघता राज्य निवडणूक आयोगाने मतदार पडताळणीला येत्या २० फ्रेबुवारी २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. शनिवार (दि.२१) पर्यंत जिल्ह्यात दीड लाख मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे.

निवडणूक आयोगाने देशभरात मतदार पडताळणी पुनर्नरिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. देशातील इतर राज्यात या मोहीमेने वेग घेतला आहे. मात्र, दोन महिन्यांपुर्वी महाराष्ट्राची निवडणूक झाली. त्यामुळे राज्यात मतदार पडताळणी मोहीम इतर राज्यांच्या तुलनेत उशीराने सुरु झाली. आयोगाच्या आदेशानूसार मतदान केंद्र अधिकारी (बीएलओं) मतदारांच्या घरी जाऊन याद्या पडताळणी करायची आहे. बोगस मतदान होऊ नये आणि बिनचूक अद्यावत मतदार यादी तयारी व्हावी यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने प्रत्येक मतदाराचा आधार नंबर आणि फोन नंबर मतदार यादीत नोंदविला जात आहे.

यातून स्थलांतरीत, दुबार, मृत आणि बोगस मतदारांची नावे आपोआप रद्द होतील. या पडताळणीत संबधित कुटुंबातील सर्वच 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींची नावे एकाच ठिकाणी नोंदविली जाणार आहे. शिवाय त्यातील जानेवारी २०२० साली १८ वर्ष पूर्ण होणार्‍या व्यक्तींची नावेही त्यात नोंदविली जाणार आहे. ती नोंदणी करणे अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील वर्षी नवीन किती मतदारांची नोंदणी होणार हे आयोगाच्या लेखी राहील.त्यासाठी निवडणूक आयोगाने २० डिसेंबर ही अंतिम मुदतही जाहीर केली होती.

परंतू या मुदतीत जिल्ह्यात काहीच काम होऊ शकले नाही. मागील आठवडयापर्यंत अवघे २३ हजार मतदारांची पडताळणी झाली. त्यानंतर येत्या फ्रेबुवारीपर्यंत या मोहीमेला मुदतवाढ देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील १५ मतदारसंघात दीड लाख मतदारांच्या घरी भेटी देऊन पडताळणी करण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही जवळपास ४३ लाख मतदारांची पडताळणी बाकी आहे.

काही मतदारसंघात मतदार पडताळणीचे काम संथ गतीने सुरु आहे. त्यांना वेग वाढविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत दीड लाख मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे.
– कुंदन सोनवणे,
जिल्हा उपनिवडणूक अधिकारी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!