Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

वणी-सापुतारा : दुचाकींंच्या अपघातात एक ठार ; तीन जखमी

Share
वणी-सापुतारा : दुचाकींंच्या अपघातात एक ठार ; तीन जखमी; Vani-Saputara : One killed in motorcycle accident; Three injured

चौसाळे | प्रतिनिधी 

वणी-सापुतारा रस्त्यावरील माळेदुमाला फाटयाजवळ दोन दुचाकींंची समोरा समोर धडक होवून एक ठार तर तीघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहे.

गुरुवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास चौसाळे, ता. दिंडोरी येथील गिरीधर केवळ तुंगार, वय ३२ व त्यांची आई रेश्माबाई केवळ तुंगार, वय ६० हे वणीहून चौसाळे येथे दुचाकीने जात असतांना बोरगांव बाजूकडून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली.

यात गिरीधर तुंगार यांस डोके व हाता पायास गंभीर दुखापत होवून जागीच ठार झाला तर रेश्माबाई तुंगार तसेच समोरील दुचाकीवरील हिरामण ढवळू बर्डे, वय ३० व साहेबराव उलशा पवार, वय ३१, रा. मगगाव (ता. कळवण) हे गंभीर जखमी झाले.

जखमींना स्थानिकांनी येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. मयत गिरीधर तुंगार यांचे रुग्णालयात शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!