Friday, April 26, 2024
Homeनाशिकउमराणे : ग्रामस्थांचा व्हाट्सऍप ग्रुप स्थापन करून अनेक उपाय योजनांचा समावेश

उमराणे : ग्रामस्थांचा व्हाट्सऍप ग्रुप स्थापन करून अनेक उपाय योजनांचा समावेश

उमराणे । वार्ताहर

कोरोना चा दिवसेंदिवस वाढत चाललेला प्रसार रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे पणशासन कुठं कुठपर्यंत पोहचणार म्हणून प्रत्येक गावाने एकत्र येऊन आपल्या ग्रामस्थांचा विचार करून उपाय योजना केल्या तर ह्यावर लवकर मात करता येईल म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास मोहनराव देवरे यानी कार्यकर्त्यांना घेऊन कोरोना मुक्त उमराणे व्हाट्सएप ग्रुपची स्थापना केली आहे ,ह्या ग्रूपमार्फत काय काय उपाययोजना करता याचा सर्व सभासद विचार मांडत आहे.
,
रेशन व किराणा ,भाजीपाला दुकान व मेडिकल समोर सोशल डिस्टन्स ने ग्रामस्थांनी खरेदी साठी उभे रहावे , दुकानदारांची फ़ोन नंबर यादी तयार करून प्रसिद्ध करावी गर्दी होणार नाही,गावात रिकामे फिरणाऱ्या ना एकदा समजून सांगावे गावात बाहेरून आलेले असेल तर ग्रामपंचायत ला त्वरित कळवावे, रक्तदान शिबीर घेऊन शासनाला मदत करावी,असे निर्णय घेण्यात आले आहेत.

- Advertisement -

सिव्हिल हॉस्पिटल नाशिक मार्फत येत्या सोमवारी दि ३० रोजी सकाळी ९ वाजता उमराणे येथे रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या