Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसंत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी वारकरी भाविकांना सुविधा देणेसाठी विश्वस्त मंडळ सज्ज- पवन...

संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी वारकरी भाविकांना सुविधा देणेसाठी विश्वस्त मंडळ सज्ज- पवन भुतडा

त्र्यंबकेश्वर | मोहन देवरे

संत निवृत्तीनाथ यात्रेसाठी येणारे वारकरी भाविक यांना यात्रेच्या गर्दीतही मंदिरात त्रास होणार नाही अशा पद्धतीने दर्शन घेता येइल असे नियोजन मंदिर ट्रस्टने केले आहे अशी माहिती संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पवन भुतडा यांनी दिली या वेळी मंदिराचे पुजारी गोसावी बंधू उपस्थित होते.यात्रा पूर्व तयारी बाबत येथे विश्वस्त मंडळाची बैठक झाली बैठकीनंतर भुतडा यांनी वरील माहिती दिली.

- Advertisement -

यात्रेत ४ ते ५ लाख वारकरी तसेच ५०० च्या आसपास दिंड्या येतात त्यांना दर्शन सुविधा देणेबाबत नियोजन झाले साधारण १८ ते २२  जानेवारी या काळासाठी हे नियोजन आहे . मंदिर जीर्णोद्धार काम काळ्या पाषाणात करणे काम सद्या वेगाने सुरू आहे थतापी यात्रा कालावधीत दि १५ ते २३ जानेवारी काळात जीर्णोद्धार काम अडथळा नको या साठी बंद राहणार आहे

पूर्व दरवाजाने भाविक मंदिरात रांगेने प्रवेश करतील व पश्चिम दरवाजाने बाहेर पडतील मंदिरात सी सी टीव्ही  योजना कार्यान्वित असून अधिक संख्या सी सी टीव्ही ची वाढवणेत येत आहे मागील दरवजाने अथवा देणगी दर्शन पद्धत या मंदिरात लागू नाही त्या मुळे वादावादी प्रसंग येत नाही रांगे शिवाय मुख दर्शन सोय भाविकांसाठी असते तसेच समाधी दर्शन सोय ही दिंड्या साठी राहील व मंदिर ट्रस्ट कडून मंदिरात दिंड्याचे स्वागत केले जाते.

नगरपालिकेने मंदिर परिसरात जादा वेळ पाणी पुरवठा करावा यात्रेतील दिंड्याना गॅस टाक्या शासनाने रास्त दराने पुरव्यात अशी मागणी ट्रस्टने पुरवठा विभागाकडे पत्र देऊन केली आहे रांग नियोजन दर्शन बारी अन्यत्र बेरिकेटिंग वर भर देणेत येत आहे मंदिरातील महापूजेचे प्रक्षेपण भाविकांना दिसेल असे नियोजन होईल

मंदिरच्या सचिव डॉ धनश्री हरदास संजय धोंगडे पंडित कोल्हे महाराज अनिल गोसावी, योगेश गोसावी जयंत महाराज गोसावी सौ ललिता शिंदे सौ जीजबाई लांडे रामभाऊ मुळाने हें व अन्य विश्वस्त उपस्थित होते

विश्वस्त जयंत गोसावी हे मातोश्रीच्या स्मरणार्थ गर्भगृहासाठी नवीन दरवाजे देत असून एक लाखाचे रुपये देणगी आहे यात्रेपूर्वी नवीन दरवाजे बसविण्यात येणार आहे विश्वस्त रामभाऊ मुळाने यांनी ५१ हजार रुपये देणगी जाहीर केली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या