Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

त्र्यंबकेश्वर : तिसरा श्रावण सोमवार तयारी अंतिम टप्प्यात; खंबाळे येथे वाहनतळ व बस सुविधा

Share

त्र्यंबकेश्वर | मोहन देवरे

त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे या वेळेस ब्रम्हगिरी प्रदक्षिणेस हजारो भाविक येतात गर्दीचा ओघ असतो तिसरा श्रावण सोमवार दि १९ ऑगस्टला आहे.

पाऊस सुरू असला तरी प्रमाण कमी झालेले आहे  प्रदक्षिनार्थी भाविक हजारोच्या संख्येने येतील असे गृहीत धरून नियोजन सुरू आहे नुकतीच अधिकारी वर्गाने त्र्यंबकेश्वर नगरीत पहाणी केली. जिल्हाधिकारी वेळो वेळी लक्ष घालून आहे त्र्यंबकेश्वर नगरपालिका आरोग्य विभाग यांनी सुविधा वाढवल्या आहेत

तळेगावहून गणपतबारी कडे येताना सापगाव लगत प्रदक्षिणा मार्गा वर खड्डा पडला आहे तेथे खड्डे भरणेची मागणी आहे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष घालून आहे दरम्यान तळेगावचे धरण या पूर्वीच भरलेले आहे सततच्या पाऊसाने लेव्हल टिकून आहे  गौतमचा धस येथे कायम स्वरूपी विज पोल उभारावे अशी सूचना आहे .

वाहन तळे त्र्यंबकेश्वर कडे येणाऱ्या  नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गा वर खंबाळे  येथे तर घोटी कडून पाहिनेबारी आंबोलीलगत येथे वाहने पार्किंग सुविधा आहेत प्रामुख्याने खंबाळे येथील पार्किंग पर्यंत  खाजगी वाहनाने भाविक येतील त्या नंतर थेतून एस टी बसने त्र्यंबकेश्वरला येतील तिसरा सोमवार त्र्यंबकेश्वर बस स्थानक गजानन महाराज मंदिरा समोर स्थलांतर होईल  एस टी च्या जादा  तीनशे बसेस सोडण्यात येणार आहे

त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात व कुशावर्त असे तीन आरोग्य कक्ष सुरू राहतील  त्र्यंबकेश्वर गावात पदाचारी वर्गासाठी एकरी वाहतूक कुशावर्त तिर्थावर येणे साठी राहणार आहे पोलीस बंदोबस्त मोठा असून साध्या वेषातील पोलीस ही प्रदक्षिणा मार्ग येथे रहाणार आहेत.

त्र्यंबकेश्वर मंदिर कुशावर्तावर गर्दीवर  नियंत्रण राहील त्र्यंबकेश्वर मंदिर महाद्वार येथे दोनशे रुपये भरून देणगी दर्शन जे रांगेत जाण्यास तयार नाही असे भाविक घेतात उत्तर दरवाजा येथे एकच गर्दी होत होती त्या मुळे सध्या देणगी दर्शन कक्ष मंदिर पोलीस चौकी समोर स्थलांतरीत झाला आहे.

अशी आहे वाहनतळ व्यवस्था
* नाशिक बाजुने येणारी वाहनांसाठी खंबाळे येथे
* जव्हार रोडने येणार्‍या वाहनांसाठी अंबोली येथे
* इगतपुरी, घोटी रोडने येणार्‍या वाहनांसाठी पहिने येथे
* गिरणारे रोडने येणार्‍या वाहनांसाठी तळवाडे येथे
* पासधारक वाहनांसाठी नगरपालिका हद्दीत कुंभारतळे येथे वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. यापुढे भाविकांना एसटीबसने प्रवास करावा लागणार आहे.

शिस्त पाळावी अन्यथा कारवाई
त्र्यंबकेश्वर, सर्व मार्ग तसेच प्रदक्षिणा मार्गावर कडक पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वर शहरात प्रवेशबंदी राहील. त्यामुळे भाविकांनी बसेसचा वापर करावा. तसेच प्रदक्षिणा मार्गावर हुल्लडबाजी, वाद विवाद न करता शिस्तीचे पालन करावे अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार आहे.
– डॉ. आरती सिंह, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!