Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकअखेर ‘त्या’ डीपींची स्वच्छता सुरू

अखेर ‘त्या’ डीपींची स्वच्छता सुरू

इंदिरानगर । वार्ताहर

परिसरातील अनेक ठिकाणी रोहित्राभोवती ( विद्युत डि पी ) पाने, वेली वाढुन विद्युत डीपीच्या भोवती घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. अनेकदा तक्रारी करून देखील साफसफाई होत नव्हती. दै.‘देशदूत’मध्ये याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महावितरणच्या अधिकार्‍यांनी त्वरित साफसफाईच्या कामास सुरुवात केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले व दै. ‘देशदूत’चे आभार मानले.

- Advertisement -

महावितरणच्या राणेनगर व इंदिरानगर कक्षमधील अनेक रोहित्रा जवळ मोठ्या प्रमाणात झाडे, वेली पसरलेली होती व त्यांना कुठेही बंदिस्त कंपांऊड नव्हते. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता होती.

काही ठिकाणी मिनिपिलर उघड्यावर आहेत, काही ठिकाणी मिनिपिलर पुष्ठे ,थर्माकोल लावलेले आढळून आले .यामुळे अनेक वेळा छोट्यामोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात अनेक ठिकाणी विजेचा प्रवाह उतरल्याने दुर्घटना घडल्या होत्या त्यात. पांडव नगरी येथे विजेचा धक्का लागल्याने एक बैल मृत्युमुखी पडला होता . चार्वाक चौक येथे देखील विजेच्या खांबाला गाय चिटकली होती.अशा  घटना  घडल्या होत्या. परिसरात रोहीत्राना आवरण बसवावे , मिनिपिलर ला देखील खराब असलेली बदलून नवी बसवावी, रोहीत्रावरील वाढलेली झाडे, पानवेली तोडण्यात यावी, अशी मागणी मागणी अनेकदा नागरिकांनी केली होती.

अखेर दै.‘देशदूत’ मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शनिवारी (दि. ११) महावितरणचे अधिकारी संतोष धारराव यांच्या मार्गदर्शनाखाली रानेनगर परिसरात हरिशक्ती सोसायटी च्या भागात रोहित्राची (डीपी) साफसफाई व फांद्यामधील अडकलेल्या तारा मोकळ्या करण्याचे कामाला सुरूवात करण्यात आली. आता ही मोहीमअर्ध्यावर न सोडता संपूर्ण परिसरात राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या