Thursday, April 25, 2024
Homeनाशिकउद्यापासून ‘मिस्तुरा आर्ट फेस्ट’

उद्यापासून ‘मिस्तुरा आर्ट फेस्ट’

नाशिक । प्रतिनिधी 

तरुणाईच्या कल्पकतेतून पुढे येणारा ‘मिस्तुरा आर्ट फेस्ट’ यंदाही शौर्य फाऊंडेशनच्या वतीने भरविला जाणार आहे.
कलाकारांना व्यासपीठ मिळण्यासाठी तसेच, कलाकारांनी नव्या युगाशी सांगड घालावी, या उद्देशाने शनिवारी (दि.२८ ) व रविवारी (दि.२९ )रोजी गंगापूर रोडवरील बापू पुलालगत असलेल्या गोदापार्क येथे हा कलासंगम रंगणार आहे.

- Advertisement -

टीम शौर्यच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून या ‘फेस्ट’चे आयोजन केले जातेे. यंदाच्या वर्षी डिजिटल ट्रान्सफार्मेशन व आणि इल्यूजन अशी थीम आहे. या निमित्ताने यूथ टॅलेंट, व्यावसायिक दृष्टिकोन, चांगल्या कलाकृती, एकाच छताखाली सगळ्या कला याचा अनुभव नाशिककरांना घेता येणार आहे. प्रदर्शनात कॅलिग्राफी, नारळाच्या कवटीपासून तयार केलेले दागिने, हँडमेड दागिने यांसारखे स्टॉल पाहायला मिळतील.

याशिवाय नाशिकच्या नामांकित कलाकारांनी तयार केलेल्या कलाकृती इंस्टालेशन म्हणून उभ्या केल्या जाणार आहेत. तसेच, फोटो व चित्रांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. फेस्टचे उद्घाटन मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मविप्र संस्था सरचिटणीस नीलिमा पवार आदींच्या उपस्थितीत होणार आहे. फेस्टमध्ये नाशिकमधल्या विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.

यावर्षी होणार्‍या फेस्टमध्ये या सगळ्या गोष्टींसह शंभराहून अधिक कलाकार सादरीकरण करणार आहेत. याशिवाय म्युझिकल नाइट, ढोलपथक, लाइव्ह फोटोग्राफ, स्मार्ट इनोव्हेशन्स आदींचे आकर्षण राहणार आहे. या महोत्सवात शंभरापेक्षा अधिक कलावंत सहभागी होत आपआपली कला सादर करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या