Friday, April 26, 2024
Homeनाशिकदेवळा येथे आज ‘देशदूत’ आरोग्य महोत्सव

देवळा येथे आज ‘देशदूत’ आरोग्य महोत्सव

नाशिक । प्रतिनिधी

‘देशदूत’च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त देवळा येथे आज  सोमवारी आरोग्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. नाशिकच्या मातीतून अंकुरलेले एकमेव वृत्तपत्र दैनिक ‘देशदूत’ यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्त जिल्हाभरात महिलांसाठी आरोग्य महोत्सव अभियान राबवण्यात येत आहे. उद्या देवळा येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आरोग्य महोत्सव होणार आहे.

- Advertisement -

‘देशदूत’ने सुवर्णमहोत्सवानिमित्त जिल्हाभरात वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. महिला आरोग्याची निकड लक्षात घेता ‘देशदूत’ने आरोग्य महोत्सवाचा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील 20 ठिकाणी महिलांसाठी आरोग्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील नामांकित नामको हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स विद्यार्थिनी व महिलांची विनामूल्य आरोग्य तपासणी करून मौलिक मार्गदर्शन करतील.

उंची, वजन, रक्तदाब, रक्तातील साखर, बीएमआय, गर्भाशय मुखाचा कॅन्सर या तपासण्या महोत्सवात केल्या जाणार आहेत. देवळा येथील आरोग्य महोत्सवाच्या उद्घाटनासाठी नगराध्यक्षा ज्योत्स्नाताई आहेर, जि. प. सदस्या नूतनताई आहेर, देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्राचार्य हितेंद्र आहेर, महाविद्यालयाच्या उपप्राचार्य मालतीताई आहेर, ‘देशदूत’चे महाव्यवस्थापक आर. के. सोनवणे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील गरजुंनी आरोग्य महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

बचत गटांची जत्रा
आरोग्य महोत्सवाच्या ठिकाणीच बचत गटांची जत्राही आयोजित केली आहे. तालुक्यातील बचत गटांना यानिमित्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. बचत गटांच्या वस्तूंंचे प्रदर्शन व विक्रीही केली जाणार आहे.

सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन
सामाजिक भान जपत ‘देशदूत’तर्फे कला, वाणिज्य व महिला महाविद्यालयाला सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन भेट देण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या