Saturday, April 27, 2024
Homeनाशिकदुगारवाडी धबधब्यात ‘कृषी’ च्या तिघा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू ; सर्व विद्यार्थी तेलंगणाचे

दुगारवाडी धबधब्यात ‘कृषी’ च्या तिघा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू ; सर्व विद्यार्थी तेलंगणाचे

नाशिक । प्रतिनिधी

औरंगाबाद येथील कृषी महाविद्यालयात शिकणार्‍या व मूळच्या तेलंगणा राज्यातील तीन विद्यार्थ्यांचा त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडी धबधब्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून बुधवारी दुपारी तिघांपैकी एका विद्यार्थीनीची मृतदेह मिळाला होता. त्यानंतर रात्री उशिरा बेपत्ता दोघा विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडण्यात वैनतेय संस्थेच्या सदस्यांना यश आले.

- Advertisement -

धबधबा पाहण्यासाठी सहा विद्यार्थी औरंगाबाद येथून नाशिक येथे आले होते. त्यातील अनुषा (वय-21) हिचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला होता. तर रघुवंशी (वय-21) व कोटी रेड्डी (वय-20) हे दोघे बेपत्ता होते. मात्र उशिरा त्यांचे मृतदेह हाती लागले. (दि.16) औरंगाबाद येथील कृषी महाविद्यालयांत शिक्षण घेणारे गिरीधर आकाश (वय-20), व्यंकटेश्वर रेड्डी (20),अनुषा,(21) रघुवंशी (21) कोटी रेड्डी(20),पाचही रा. तेलंगणा ) व काव्या एल (20) रा. हैदराबाद हे सर्व नाशिकहून त्र्यंबकेश्वर येथे दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी आले होते.

दि.17 रोजी दुपारी साडेचार वाजता दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी ते पोहचले. त्यापैकी गिरीधर आकाश, व्यंकटेश्वर रेड्डी, काव्या एल. यांनी अनुषा, रघुवंशी, कोटी रेड्डी यां तिघांना ‘धबधबा पाहू नका’ असे सांगून ते त्र्यंबकेश्वरला निघून आले. दरम्यान, अनुषा, रघुवंशी आणि कोटी रेड्डी हे त्र्यंबकेश्वरला परतलेच नाही, म्हणून (दि.18) सकाळी 10 वाजता वरील घटनेच्या ठिकाणी त्यांना शोधण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना धबधब्याजवळील पाण्यात अनुषाचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यानंतर त्यांनी गावकर्‍यांना ही माहिती दिली.

गावकर्‍यानी त्र्यंबकेश्वर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. दरम्यान, अनुषाचा मृतदेह सापडला असतांना रघुवंशी व कोटी रेड्डी हे बेपत्ता होते. मात्र, नाशिक येथील वैनतेय संस्था, स्थानिक प्रशासन व त्र्यंबकेश्वर पोलिसांनी शोध मोहिम तीव्र करून बेपत्ता दोघांचा शोध सुरू केला. रात्री उशिरा रघुवंशी व कोटी रेड्डी या दोघा विद्यार्थ्यांचा मृतदेह शोधण्यात यश आले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली. मृतदेह मिळालेल्या विद्यार्थ्यांच्य पालकांना कळविण्यात आले असून पोलीस देखील या घटनेचा तपास करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या