Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकयंदा द्राक्ष हंगामास उशिरा प्रारंभ

यंदा द्राक्ष हंगामास उशिरा प्रारंभ

लासलगाव। वार्ताहर

प्रारंभीचा उशिरा पाऊस आणि त्यानंतर परतीच्या पावसाने दिर्घकाळ लावलेली हजेरी यामुळे द्राक्ष हंगाम उशिरा सुरु होत असल्याने त्याचा फटका निर्यातक्षम द्राक्षाला बसत असून यावर्षी २८ जानेवारीपर्यंत अवघी ३६४ कंटेनरद्वारे ५ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक द्राक्षे नेदरलॅण्ड आणि जर्मनी या बाजारपेठेत निर्यात झाली आहे. परकीय बाजारपेठेत द्राक्षाची निर्यात जोरदार सुरु झाली असतांना त्या तुलनेत राज्याच्या द्राक्ष शिवारात संथ हालचाली दिसून येत आहे. निर्यातक्षम द्राक्षांची ९० ते १२० रु. प्रतिकिलो दराने खरेदी होत असून स्थानिक पातळीवर द्राक्षाला अवघा ३० ते ४० रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहे.

- Advertisement -

यावर्षी परतीच्या पावसामुळे द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रतिकूल हवामानामुळे घडकूज, डावणी, भुरी आदी रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकर्‍याला मोठी कसरत करावी लागत असतांनाही यावर्षी जवळपास ४० टक्के द्राक्षबागा वाया गेल्या आहे. त्यामुळे यावर्षी द्राक्ष चांगला बाजारभाव राहील अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. त्याचप्रमाणे निर्यातक्षम द्राक्षाला देखील चांगला दर मिळवून मुबलक उत्पादन येईल अशी अपेक्षा होती. मात्र द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीलाच बाजारभाव कमालीचे खाली आल्याने शेतकर्‍यांपुढील अडचणीत वाढ झाली असून यावर्षी द्राक्ष पिकावर झालेला खर्च देखील फिटेल की नाही अशी परिस्थिती तयार झाली आहे.

देशात द्राक्ष उत्पादनात नाशिक जिल्हा अग्रेसर असून त्यातही निफाड तालुक्याला द्राक्षाची पंढरी म्हटले जाते. निफाड बरोबरच नाशिक, दिंडोरी, सटाणा, बागलाण, सिन्नर आदी तालुक्यात देखील द्राक्षाची पिक मोठ्या प्रमाणात घेतल जाते. मात्र असे असतांनाही जिल्ह्यात अवघी ३३ हजार १४४ शेतकर्‍यांनी द्राक्षनिर्यातीसाठी नोंदणी केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात घट झाल्याचे दिसून येत असून त्यास उन्हाळ्यातील पाणीटंचाई आणि त्यानंतर परतीच्या पावसाची दिर्घकाळ हजेरी यामुळे द्राक्ष उत्पादनात घट झाल्याचे बोलले जात आहे. मात्र असे असतांनाही उत्पादन घटले तरी भाव वाढणे गरजेचे असतांनाही तसे होत नसल्याने द्राक्षाला कमी भाव मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या