१३ जानेवारीला नाशिक शहरात पाणी पुरवठा होणार नाही

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी 

शहरात पाणी पुरवठ्यासंदर्भात विविध विभागातील दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात आले आहे. यामुळे गंगापूर धरण, चेहेडी पंपींग स्टेशन व मुकणे धरण पंपींग स्टेशन येथील वीज पुरवठा दि.१३ रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दि.१३ रोजी संपूर्ण नाशिक शहरात संपूर्ण दिवसभर व सायंकाळी पाणी पुरवठा होणार नाही.

महापालिकेच्या गंगापूर धरण रॉ वॉटर पंपिग स्टेशन येथील ३.३ केव्ही केबलची फिडरला जोडणी करणे, पाथर्डी फाटा येथील क्रॉस कनेक्शनचे काम करणे, बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र 3 लक्ष गॅलन टाकीचा इनलेट पाईपवरील लिकेज दुरुस्ती, सबस्टेशन येथील सीटीपीटी बसविणे, शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथील सेकंड फेज फिल्टर बॅकवॉश व्हॉल दुरुस्ती करणे, पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील क्लॅरीफायर लिकेज दुरुस्ती करणे, नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथील सबस्टेशन पीटी बदलणे, पंपहाऊस मधील मेन पॅनलची केबल नवीन लग भरुन जोडणे, अशी कामे येत्या १३ जानेवारी रोजी केली जाणार आहे.

याकामासाठी गंगापूर धरण, चेहेडी पंपींग स्टेशन व मुकणे धरण पंपींग स्टेशन येथील वीज पुरवठा या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात यादिवशी संंपूर्ण दिवसभर व सायंकाळी पाणी पुरवठा होणार नाही. तसेच दि. १४  रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होणार असल्याचे महापालिकेकडुन कळविण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *