Saturday, May 11, 2024
Homeनाशिकप्रत्येक गड-किल्ल्यांपर्यंत जाणार लालपरी

प्रत्येक गड-किल्ल्यांपर्यंत जाणार लालपरी

नाशिक । प्रतिनिधी

राज्यातील गड आणि किल्ल्यांचे पावित्र्य राखून त्या ठिकाणी पर्यटन वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना या गड-किल्ल्यांची सफर करता यावी, यासाठी प्रत्येक गड आणि किल्ल्यापर्यंत एसटी महामंडळाच्या बसची सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न राज्याचा पर्यटन व पर्यावरण विभाग करणार आहे.

- Advertisement -

पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दुर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि ट्रेकिंग संस्थांच्या प्रतिनिधींची नुकतीच मुंबई येथील सह्याद्री विश्रामगृहात बैठक घेतली. या वेळी पर्यटन व उत्पादन शुल्क खात्याचे सचिव, विविध संघटनांचे पदाधिकारी, भटकंती मालिकेच्या निमित्ताने राज्यातील किल्ल्यांची जनतेला ओळख करून अभिनेते मिलिंद गुणाजी आदी या बैठकीला उपस्थित होते.

आदित्यठाकरे यांनी ‘ट्रेकर्स’चे विविध प्रश्न या वेळी जाणून घेतले. त्याचप्रमाणे दुर्गपर्यटन वाढवण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा केली. गडांवर ट्रेकिंगसाठी जाणार्‍यांची संख्या अधिक असते. या ठिकाणी ‘रेस्क्यू’ प्रणाली कशी कार्यान्वित करता येईल, याचाही आढावा घेण्यात आला. दरम्यान, राज्यातील गड आणि किल्ले हे आपल्यासाठी मंदिरे आहेत. त्यामुळे या ठिकाणांचे पावित्र्य जपणे आपले कर्तव्य असल्याचे ठाकरे या वेळी म्हणाले.

फलक लावणार
परराज्यातील नागरिकांसह परदेशी नागरिकांनादेखील आपल्या गडकोटांची माहिती मिळावी, यासाठी विमानतळापासून एसटी स्थानकापर्यंत सर्वत्र गड किल्ल्यांची माहिती देणारे फलक लावण्याचा विचार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या