Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी

नगरसेवक जगदीश पाटील यांचे पोलीस आयुक्तांना पत्र

पंचवटी । वार्ताहर

- Advertisement -

मुंबई बाजार समितीत भाजीपाला व्यापाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे नुकतेच निष्पन्न झाले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती व शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात मुंबई येथून येणाऱ्या व्यापाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बाजार समितीत येणारे शेतकरी, व्यापारी, अडतदार, हमाल, मापारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपायोजना कराव्यात, अशा मागणीचे पत्र प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक तथा सभागृह नेता जगदीश पाटील यांनी पोलीस आयुक्त, पंचवटी पोलीस ठाणे, नाशिक बाजार समिती सभापती व सचिव यांना दिले आहे.

सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला तुटवडा निर्माण होऊ नये, याकरिता बाजार समित्या सुरू ठेवल्या आहे. त्या नुसार नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांना करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारा कामगार हमाल, छोटे मोठे भाजीपाला व फळ किरकोळ विक्री काम करणारे हे प्रभाग क्रमांक चार येथील रहिवाशी वर्ग यांचे प्रमाण जास्त आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात फळे, कांदा, बटाटा घेण्यासाठी मुंबई येथील व्यापारी यांचे प्रमाण देखील जास्त आहे. यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसेच बाजार समितीत वाढती गर्दी बघता किरकोळ शेतमाल विक्री व किरकोळ विक्रेते यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, पेठ रोडवरील शरदचंद्रजी मार्केट यार्डा बाहेर रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत जवळपास एक किलोमीटर परिसरात शेतमाल विक्रीसाठी शेतकरी व व्यापारी यांची गर्दी होत आहेत. या ठिकाणी ही मुंबई येथील व्यापारी येत असल्याने करोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, तसेच त्याचा त्रास हा परिसरातील नागरिकांना होऊ शकतो यावर ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अन्यथा प्रतिबंध करावा असे पत्र पाटील यांनी दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या