Friday, April 26, 2024
Homeनाशिकदै .’देशदूत’ आयोजित तेजस पुरस्कार मतदानाचा आज अखेरचा दिवस

दै .’देशदूत’ आयोजित तेजस पुरस्कार मतदानाचा आज अखेरचा दिवस

७२ देशांतील वाचकांकडून मतदान

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेली ‘देशदूत’ तेजस पुरस्कार-२०२० ची मतदान प्रक्रिया आज संपृष्टात येणार आहे. जवळपास ७२ पेक्षा अधिक देशांतून या पुरस्कारासाठी मतदान झाले आहे.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या युवकांचा ‘देशदूत’च्या वतीने दरवर्षी ङ्गतेजसफ पुरस्कार प्रदान करून गौरव केला जातो. पुरस्काराचा एक भाग म्हणून ‘देशदूत’ च्या www.deshdoot.com संकेतस्थळावर गेल्या दहा दिवसांपासून ऑनलाईन मतदान प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत विविध देशांतील लाखो वाचकांनी मतदान केले आहे. यावर्षी सहा क्षेत्रांमधून नामांकने मागवण्यात आली होती. यामध्ये सेल्फ सस्टेन्ड बिझनेस, सामाजिक/सांस्कृतिक, फायनान्स, विधी, वैद्यकीय व प्रगतिशील शेती या क्षेत्रांचा समावेश आहे. मतदान सुरू झाल्यापासून तेजस पोलची लिंक सोशल मीडियासह सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे या लिंकवर दर सेकंदाला शेकडो वाचक मतदान करत आहेत.

हे मतदान आज (दि.२९) सायंकाळी ६ वाजेपर्यंत करता येणार आहे. सर्वात जास्त मतदान मिळवणार्‍या युवकांना पुरस्कार वितरणाच्या दिवशी विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

असे करा मतदान
‘देशदूत’च्या www.deshdoot.comया संकेतस्थळावर जा. या ठिकाणी गेल्यावर तेजस पुरस्कारासाठी मतदान करा अशी खिडकी दिसेल. खिडकीवर क्लिक केल्यानंतर नामांकनप्राप्त युवांची नावे दिसतील. एका युजरला प्रत्येक कॅटेगिरीतील एका व्यक्तीला मतदान करता येईल.

सोशल मीडियात चर्चा तेजसचीच
सर्वात शीघ्र संपर्काचे माध्यम समजल्या जाणार्‍या सोशल मीडियातील विविध प्लॅटफॉर्ममध्ये देशदूतच्या तेजस पुरस्काराची प्रचंड चर्चा सुरु आहे. विविध ठिकाणी लिंक शेअर केल्या जात आहेत. अनेक नामांकनप्राप्त युवक मतदान करण्यासाठी विविध ठिकाणी लिंक शेअर करून मतदान करण्याचे आवाहन करताना नजरेस पडत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या