Friday, April 26, 2024
Homeनाशिकतेजस पुरस्कार मुलाखत : सकारात्मता आणि संवादातून यश – विशाल पोतदार

तेजस पुरस्कार मुलाखत : सकारात्मता आणि संवादातून यश – विशाल पोतदार

नाशिक | प्रतिनिधी 

वयाच्या २१ व्या वर्षी चार्टर्ड अकाउंट परीक्षेत पास,
चार्टर्ड अकाउंटंट, जी. एस. टी. आणि कस्टम अधिकारी प्रशिक्षक, समुपदेशक,
देशात ४०० हून अधिक जी. एस. टी. सेशन्स घेतले. याचसाठी नॅशनल अ‍ॅवॉर्ड, डिस्टिंगविशड जी. एस. टी. ट्रेनर पुरस्काराने सन्मानित,
आतापर्यंत २००० हून अधिक व्यावसायिक विद्यार्थ्यांना शिकवले आहे, त्यातील ६३ विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकले.

- Advertisement -

मी मुख्यत्वे सी. ए. च्या विद्यार्थ्यांना शिकवतो. सी. ए, सी. एम. ए आणि सी. एस(कंपनी सेक्रेटरी) यांना प्रशिक्षण देतो. माझे कोचिंग क्लासेस आहेत. मुंबई, पुणे, सुरत या ठिकाणच्या एम. बी. ए. कॉलेजेसमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवतो. जी. एस. टी. ट्रेनर आहे. सी. ए. असोसिएशनचा नियुक्त प्रशिक्षक आहे. जी जी. एस. टी. आणि कस्टम अधिकार्‍यांनादेखील मी जी. एस. टी. च प्रशिक्षण देतो. अशा अनेक संस्थांचा मी प्रशिक्षक आहे.

मी वयाच्या २१ व्या वर्षी सी. ए. झालो. माझे बालपण मुंबईत गेले. पंधराव्या वर्षी दहावी झालो. त्या वयात शिक्षण घेणे माझ्यासाठी आव्हान होते. परिस्थिती कितीही आव्हानात्मक असो, मी कधीच कोणत्याही गोष्टीच टेन्शन घेत नाही. आयुष्यात जशी जशी परिस्थिती आली तसतशी मी ती सकारात्मकतेने स्वीकारतो. सी. ए. होणार, जी. एस. टी. ट्रेनर होणार असे मी कधीच ठरवले नव्हते. या सगळ्या गोष्टी अपघाताने माझ्या आयुष्यात आल्या आणि त्या मी स्वीकारल्या असेच म्हणायला पाहिजे.

२०१६ मध्ये जी. एस. टी. येणार होता, तेव्हा दोन वर्षे मी घरीच नव्हतो. जीएसटी प्रशिक्षक म्हणून ७५ टक्के भारत फिरलो आहे. आतापर्यंत जी. एस. टी. वर ४०० हून अधिक सेशन घेतले आहेत.माझ्या कार्याची दखल घेत मला डिस्टिंगवीश जी. एस. टी. ट्रेनर ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अ‍ॅवॉर्ड २०१८ मध्ये मिळाले.

त्याचे एकच कारण मी विद्यार्थ्यांना, चार्टर्ड अकाउंटंसला, कॉर्पोरेटसलाही आणि जी. एस. टी. ऑफिसर्सलाही प्रशिक्षण दिलेय. एक दीड वर्षे घराबाहेर राहणे, काम करणे हे सगळे शक्य झाले माझ्या बायकोच्या आणि घरच्यांच्या भक्कम आधारामुळे. सी. ए. ट्रेनिंगची पहिली बॅच २०० मध्ये सुरू केली, त्यातील ६३ विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. आतापर्यंत २ हजार हून अधिक विद्यार्थी माझ्याकडे शिकले आहेत. मी 4 वर्षांपासून पर्सनल कौन्सिलर म्हणून काम करत आहे. खास करून तरुण विद्यार्थ्यांंसाठी.

आजकाल मल्टिटास्किंग करताना आव्हानेदेखील खूप असतात. अशा वेळी फोकस्ट, बॅलेन्स राहणे खूप गरजेचे आहे.ह्या गोष्टी कशा करायच्या, हे मी माझ्या कौन्सिलिंगमध्ये सांगतो. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात मला यश आले आहे, हे माझ्या कामाचे खूप मोठे यश आणि समाधान आहे, असे मी मानतो.

या सगळ्या गोष्टी करताना मी माझ्या आरोग्याकडे, छदांकडे तेवढेच लक्ष देतो. दिवसातले तीन तास मी शारीरिक कसरतीसाठी देतो. त्यात योगा करणे, क्रिकेट, फुटबॉल खेळणे असो अथवा मॅचेस असो.. मी योगाभ्यासाच्या दोन लेव्हल पास केल्या आहेत. मला मराठी नाटकांमध्ये काम करायला आवडते. तसेच आतापर्यंत मी अनेक वक्तृत्त्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा जिंकल्या आहेत. मला संगीताची सूत्रसंचालन करण्याचीदेखील खूप आवडते. ज्या गोष्टी आवडतात त्या मी आवर्जून करतो.

आतापर्यंतच्या माझ्या कौटुंबिक, आर्थिक, शैक्षणिक, प्रवासात मला लाखमोलाचा पाठिंबा लाभला तो माझ्या कुटुंबियांचा. त्यांची प्रेरणा आणि खंबीर आधाराशिवाय मला हे यश मिळविणे शक्य नसते. म्हणून मी सगळ्यांना हेच सांगेल की, आधी तुमचे आरोग्य, मग कुटुंब आणि मग तुमचे काम असे तुमचे आयुष्य हवे. लोक नेमक उलट करतात. हे सगळे करताना सकारात्मकता आणि संवाद अखंड ठेवा. वाचनाची सवय लावून घ्या. मग बघा, यश तुमचेच आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या