Type to search

Breaking News Featured तेजस नाशिक मुख्य बातम्या

तेजस पुरस्कार मुलाखत : गोदावरीचे जतन ही आपली जबाबदारी- अ‍ॅड. प्रवर्तक पाठक

Share
तेजस पुरस्कार मुलाखत : गोदावरीचे जतन ही आपली जबाबदारी- अ‍ॅड. प्रवर्तक पाठक; Tejas Award-2020, Interview-Adv. Pravartak Pathak

नाशिक | प्रतिनिधी 

स्वखर्चाने गोदावरी प्रदूषण खटला लढत आहेत, 
पर्यावरण कायद्यांसंदर्भात जाहीर व्याख्याने,
मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ पॅनेल समुपदेशक,
पर्यावरण कायदे तज्ञ अशी ओळख.

मी मुळचा नाशिकचा. नाशिकरोड परिसरात माझं बालपण गेलं. पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये शालेय शिक्षण तर पुढे अकरावी बारावी बिटको कॉलेजमध्ये पूर्ण केलं. आपण ज्या समाजात राहातो त्याचा अभ्यास केला पाहिजे या विचारातून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. कायद्याचा अभ्यास एनबीटी लॉ कॉलेज आणि पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून केला. आंतरराष्ट्रीय कायदा व लवाद मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली.

घरातल वातावरण कायमच मला स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन देणार आहे. वडील वकील आणि सामाजिक कामांमध्ये सक्रीय असल्यामुळे लहानपणापासून कायमच समाजभान आपोआप रुजलं. जेलरोडवरील सायट्रिक परीसराजवळ गोदाकाठ आहे. लहानपणी मित्रांसोबतच तिथे जायचं. नदीत पोहायचं आणि पाण्यात तासनतास खेळायचं हा सगळ्यात आवडता छंद होता. मला आठवतंसाधारपणे १९९३-९४  साल असेल तेव्हापासून नदीत खेळल्यानंतर आमच्या अंगाला खाज येणं सुरु झालं. पुढे पाण्याला वासही येऊ लागला.

पण नंतर शिक्षणाचा व्याप वाढला. दुनियादारी वाढली. गोदावरी काठावर जाणं इतिहास जमा झाल. दुसरीकडे आधीपासून नाटकसिनेमालिखाण याचीही आवड होती. मग शिक्षण घेत असतांना दैनिकांच्या पुरवणीत लिखाण सुरु केलं. राजीव पाटील यांच्या सावरखेड एक गाव या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम  करण्याची संधी मिळाली.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांच्याकडे प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. २०११ पासून स्वतंत्रपणे कामाची सुरुवात केली. मुंबई हायकोर्टातूनच वकीली करायची हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत दाखल झालो. मुंबई आल्यानंतरही नाशिकशी नात कायमच राहीलं. सुट्टीच्या दिवशी नाशिकला येण होतं. त्यामुळे नाशिकचे प्रश्नबदल नवीन नव्हते.

 
दरम्यान माझ्या हदयाच्या अगदी जवळ असलेल्या आणि स्वत: अनुभवलेल्या गोदावरी नदी प्रदुषणाचा प्रश्न माझ्याकडे आला. मग कायस्वखर्चातून जनहित याचिका दाखल करून बाजू लढण्यास सुरुवात केली. मुळातच प्रश्न गंभीर आणि दूर्लक्षित. त्यामुळे न्यायालयाने विशेष लक्ष देऊन प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाला कडक पावले उचलण्यास सांगितले तेव्हा आमच्या लढ्याला यश मिळाले.

अशा प्रकारे पर्यावरणाशी संबंधित ठाण्यातल्या खाडीचा प्रश्नकोस्टल रोड प्रोजेक्टनाशिकचे पाणी वाटप अशा अनेक खटल्यांचे काम माझ्याकडे आहे.

 

याशिवाय फौजदारीनागरीकॉर्पोरेटआयपीआरसेवा आणि प्रशासकीयकामगारपर्यावरणघटनात्मक कायदेखासगी आंतरराष्ट्रीय कायदा आणि व्यावसायिक लवादाशी संबंधित विषयांवर काम करत आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या वरिष्ठ पॅनेलवर नियुक्त असून महत्वपूर्ण प्रकरणात केंद्र सरकारची बाजू मांडत आहे. ठाण्यातील अनाधिकृत होर्डींग प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने ठाणे शहरातील कोर्ट कमिशनर म्हणून माझी नेमणूक केली आहे. 

 
राज्यस्तरीय कार्यशाळाकॉन्फरन्सव्याख्याने आदीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनत्यासंदर्भातील कायदे यावर जनजागृतीचे काम सतत सुरु असते. सोमय्या कॉलेजमध्ये सुरु असलेल्या पर्यावरण नियोजन विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्याचीही संधी मला मिळाली आहे. कायद्यासंदर्भात काम करत असतांना माझी पत्नी वरदा हिची मोलाची साथ लाभली आहे. तिच्या सहकार्यामुळेचे वेगवेगळ्या विषयांवर यशस्वीरीत्या काम करता येते.

 

मला तरुणांना आणि विशेष करून नाशिककरांना सांगावेसे वाटते कीगोदावरी नदी ही आपली ओळख आहे. या नदी काठावर आपले शहर वसले आहे. अनेक उद्योगव्यवसाय याच नदीमुळे नाशिकमध्ये आले आहेत. जिल्ह्याचे संपूर्ण अर्थकारणआपले अस्तित्व याच नदीवर अवलंबून आहे. तेव्हा या नदीचे जतनसंवर्धन ही आपलीच जबाबदारी आहे. हे मान्य केले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गोदावरीचे प्रदूषण रोखले पाहिजे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!