Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

२१ जुलै ला स्वराज फाउंडेशनच्या वतीने नाशिक शहरात ‘रन फॉर ऑर्गन’

Share

 

नाशिक । प्रतिनिधी

स्वराज फाउंडेशनच्या वतीने दि २१ जुलै रोजी नाशिक शहरात अवयवदान जनजागृती करता ‘रन फॉर ऑर्गन’ या मिनी रन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने देण्यात येणार्‍या टी-शर्ट चे अनावरण काल  करण्यात आले. तसेच या उपक्रमात देण्यात येणार्‍या मानचिन्हाचेही अनावरण करण्यात आले.

दि.२१ जुलैला या उपक्रमाच्या निमित्ताने नाशिक शहरामध्ये अवयवदान जनजागृतीचा जागर होणार असून, सर्व नाशिककरांनी या उपक्रमात भाग घ्यावा व शहराचे नाव जगाच्या पलीकडे उमटावे असे आवाहन कार्यक्रमाच्या संयोजिका योगिता खांडेकर यांनी केले आहे.

अनावरण कार्यक्रमप्रसंगी नाशिक जिमखाना अध्यक्ष नरेंद्र छाजेड, बीवायके कॉलेजचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, जिल्हा परिषद बांधकाम सभापती मनीषा पवार, मोतीवाला कॉलेज डॉ. फरान मोतीवाला, डॉ स्वानंद शुक्ला, स्वराज फाऊंडेशनचे संस्थापक अ‍ॅड.आकाश छाजेड, योगिता खांडेकर, समिना मेमन, गोकुळ पिंगळे, पूनम आचार्य, पूनम शर्मा, अनुपमा मराठे, गीता माळी , सचिन भुजबळ, गुंजन पुरोहित, नेहा वाघ, सोनाली देशपांडे, राज छाजेड, मनीषा शिंदे, मुन्ना सूर्यवंशी, मधू मित्रा, मल्हार वाघ आदी मान्यवर उपस्थित होते .

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!