Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकफार्मसी, कृषीसाठी ‘एमएचटी-सीईटी’ अर्ज भरण्यास सुरुवात

फार्मसी, कृषीसाठी ‘एमएचटी-सीईटी’ अर्ज भरण्यास सुरुवात

नाशिक । प्रतिनिधी

औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी आणि कृषी पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली ‘एमएचटी-सीईटी‘ प्रवेशप्रक्रिया जाहीर झाली आहे. मंगळवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, ही परीक्षा १३ ते १७ एप्रिल आणि २० ते २३ एप्रिल या दोन टप्प्यात होणार आहेत. परीक्षा अर्ज व इतर सर्व माहिती ‘महासीईटी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली.

- Advertisement -

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेश परीक्षेसाठी ७ जानेवारी ते २९ फेब्रुवारी या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. ज्यांना या मुदतीत अर्ज करता आले नाहीत त्यांना विलंब शुल्कासह १ ते ७ मार्च या दरम्यान अर्जासाठी मुदत आहे. परीक्षेचे शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहे, असे राज्य सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, पहिल्याच दिवशी ५५० जणांनी अर्ज केले असून, त्यातील १८९ अर्ज पूर्ण भरून जमा केले आहेत. एमएचटी-सीईटी १३ ते १७ एप्रिल आणि २० ते २३ एप्रिल अशा दोन टप्प्यांत सकाळी आणि दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे. त्याचे वेळापत्रक चार महिने आधीच सीईटी सेलने जाहीर केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. या प्रवेश परीक्षेचे अर्ज, वेळापत्रक यासह इतर माहिती ुुु.ारहरलशीं.ेीस या संकेतस्थळावर प्रसिद्ध उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नोंदणी व अर्जासाठी मुदत : २९ फेब्रुवारीपर्यंत
विलंब शुल्कासह अर्जाची मुदत : १ ते ७ मार्च
परीक्षा-१३ ते १७ एप्रिल, २० ते २३ एप्रिल
निकाल ३ जून.

- Advertisment -

ताज्या बातम्या