Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मुंबई पुण्यासारखी झोपडपट्टीसाठी एसआरए योजना राबवावी

Share
मुंबई पुण्यासारखी झोपडपट्टीसाठी एसआरए योजना राबवावी; SRA should be implemented for slums like Mumbai Pune

सातपूर । प्रतिनिधी

महादेववाडीतील शिवम थिएटर कित्येक वर्षांपासून बंद पडलेले आहे.ते पुन्हा सुरु होणार नाही.तरीही थिएटरकडे जाणारा रस्ता मोकळा करण्यासाठी एवढा आटापिटा का केला जात आहे.रस्ता महत्वाचा की स्थानिक रहिवाश्यांचे जीवन महत्वाचे याचा विचार केला पाहिजे.महानगरपालिका प्रशासनाने न्यायालयात जर भक्कम बाजू मांडली तर नक्कीच न्याय मिळू शकतो. रस्ता देण्यास हरकत नाही मात्र आहे त्याच ठिकाणी मुंबईच्या धर्तीवर एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) योजनेच्या माध्यमातून घरकुल योजना तयार करुन या घरकुलात बाधितांची सोय करावी अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे.

हॉटेल आयोध्या येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत व्यासपीठावरडॉ.डी.एल. कराड यांच्यासह नगरसेवक सलिम शेख, नगरसेवक योगेश शेवरे, नगरसेविका सिमा निगळ, रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, रिपाईच्या जिल्हाउपाध्यक्षा ज्योती आहीरे, शहराध्यक्षा मनाली जाधव हे उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डॉ.कराड म्हणाले की, बंद पडलेल्या शिवम थिएटरचे अस्तित्वही शिल्लक नसताना त्यासाठी कष्टकर्‍यांचे संसार उध्वस्त करुन झोपड्या उठविण्याचा अट्टहास का ? तसेच घोषित झोपडपट्टीच्या जागेवर आरक्षण टाकता येत नसतांनाही नाशिक मनपाने सातपूरच्या महादेववाडी झोपडपट्टीत डीपी प्लॅनचे आरक्षण टाकलेच कसे? असा सवाल उपस्थित करत येत्या गुरुवारी (दि.२) जिल्हा न्यायालयात ंहोणार्‍या सुनावणीनंतर मनपाने भक्कम आणि ठोस भूमिका मांडून बाधित नागरिकांना न्याय देण्यासाठी सहानुभुतीपुर्वक विचार करण्याची भावना सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी.एल. कराड यांच्यासह प्रभाग क्र.११ मधील सर्वपक्षीय नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

रिपाइंचे जिल्हाअध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी सन १९९५, २००१ आणि २००५ साली शासनाने घोषित केलेल्या ’स्लम’ मध्ये महादेववाडीचा देखील समावेश आहे. त्यानुसार मनपाने सर्व प्राथमिक आणि नागरी सुविधा पुरविल्या आहेत. आता त्याच सुविधा अतिक्रमित कशा ठरविल्या जात आहेत. केवळ खुर्ची वाचविण्यासाठी आणि स्वतःच्या सन्मानासाठी नागरिकांचा बळी देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप श्री लाेंंढे यांनी केला.

नगरसेवक सलीम शेख यांनी यावर बोलताना वर्षानुवर्षे वास्तव्याला असलेल्या रहिवाश्यांचे हित लक्षात घेऊन मनपाने येत्या गुरुवारी (दि.२ ) न्यायालयात योग्य ती भूमिका मांडून बाधित नागरिकांना न्याय मिळवून द्यावा. आहे त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेच्या माध्यमातून घरकुल तयार करावेत.आणि बाधित नागरिकांना त्यात समाविष्ठ करावेत अशीही मागणी त्यांनी केली.
यावेळी नगरसेवक सीमा निगळ, योगेश शेवरे तसेच स्थानिक रहिवाशी गणेश गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त करुन नागरीकांच्या पूनर्वसनासोबतच न्यायाची मागणी केली .

कर बुडवण्यासाठी नाट्य?
शिवम टॉकीज मालकाने मनपाचा लाखो रुपयांचा कर बुडवला आहे. त्याच्या वसूलीच्या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेतून प्रशासनाला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!