Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक महानगर पालिकेतर्फे सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी

Share
नाशिक महानगर पालिकेतर्फे सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी; Spraying disinfectant in public place by Nashik Municipal Corporation

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेतर्फे करोना विषाणूचा प्रसार रोखणे कामी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून फरशी टेबल बिल्डिंग चे रेलिंग बसण्याची बाकडे आदी सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. याबाबत प्रायोगिक तत्त्वावर फवारणी यशस्वी झाली असून आज दिनांक १८/०३/२०२० रोजी राजीव गांधी भवन तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व सीबीएस बस स्थानक याठिकाणी करोना प्रतिबंधात्मक औषध फवारणी नाशिक महानगर पालिकेतर्फे करण्यात आली.

नाशिक शहरामध्ये आज पर्यंत करोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव आलेला नाही परंतु भविष्यात एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आला तर मात्र सदर औषध फवारणी व्यापक प्रमाणावर करण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाची औषध फवारणी ची पूर्वतयारी करण्यात आलेली आहे.

नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की करोना विषाणू बाबत घाबरून जाण्याचे कारण नाही.नाशिक महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक अशा सर्व उपाययोजना केलेल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!