Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजातवैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम

जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम

नाशिक । प्रतिनिधी

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी काही उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने १ एप्रिल ते ३० जून २०२० या तीन महिन्यांच्या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती ‘बार्टी’कडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये; यासाठी राज्यातील सर्व जिल्हा जात पडताळणी समित्यांना विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेच्या कालावधीत जवळपास सर्व प्रकरणे निकाली काढण्यात येतील.

ज्या प्रकरणांमध्ये त्रुटी आहेत, त्या विद्यार्थ्यांना कळवून त्रुटींची पूर्तता करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ३१ मे पर्यंत जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही, अशा विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे त्रुटींची पूर्तता करावी. त्यासाठी आवश्यक पुरावे आणि मूळ कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तक्रार निवारण कक्ष :

टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक :  १८००२३३०४४४

व्हाट्सअ‍ॅप क्रमांक :  ९४०४९९९४५२ किंवा ९४०४९९९४५३

ई-मेल आयडी : [email protected]

संकेतस्थळ लिंक : https:barti.maharashtra.gov.in/ECasteValidation/CCVIS

- Advertisment -

ताज्या बातम्या