Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रुम होणार कार्यरत; १५ डिसेंबरपासून ऑन लाईन स्मार्ट सेवांना प्रारंभ

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक सेफ अ‍ॅण्ड वायफाय सिटी करण्यासाठी सुरू असलेल्या कामांत महत्वपुर्ण टप्पा असलेले इंटेग्रेटेड कंमाड अ‍ॅण्ड कंट्रोल रुमचे काम पुर्ण झाल्यानंतर येत्या १५ डिसेंबरपासून शहरात स्मार्ट पार्किंग, स्मार्ट सिग्नल, प्रापर्टी टॅक्स, घंटागाडी प्रकल्प अशा ऑन लाईन सेवेस प्रारंभ होणार आहे.

नाशिक स्मार्ट सिटी कंपनी, महापालिका, शहर पोलीस आणि महाआयटी अर्थात महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांची संयुक्त बैठक आज महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक अजित पाटील, आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौघुले व स्मार्ट सिटी सीईओ प्रकाश थविल यांच्यासह अधिकारी यांच्यासोबत झाली.

शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या इंटेग्रेटेड कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रुमची पाहणी करीत याच्या स्थितीची माहिती घेतली. या कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल रुममधुुन १५ डिसेंबर २०१९ पासून चार, पाच सेवा ऑन लाईन सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यानुसार स्मार्ट पार्कींग, स्मार्ट सिग्नल (स्मार्ट पायलट रोडवरील सीबीएस व मेहेर सिग्नल), प्रापर्टी टॅक्स, स्वच्छता सर्व्हेक्षण २०१९ अंतर्गत घंटागाडी सेवा (यात नागरिकांना आपल्या भागात आलेल्या घंटागाडीचा अलर्ट मिळणार आहे.)अशा सेवा ऑनलाईन स्वरुपात सुरू करण्यात येणार आहे.

तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिकमध्ये इंटिग्रेटेड कमांड ड कंट्रोल सेंटर उभारण्यात येत आहे. याअंतर्गत ८०० सीसीटीव्ही बसवले जाणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमार्फत कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. इंटिग्रेटेड कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरमध्ये आयटीएमएस म्हणजेच इंटेलिजंट ट्राफीक मॅनेजमेंट सिस्टम याद्वारे राबवण्यात येत आहे

यामुळे प्रवाशांना फायदाच होणार आहे. शहरात लावण्यात येणार्‍या एलईडी लाईट्सचे संनियंत्रण असणार आहेत. एनवायरमेंटल सेंसर रस्त्यावर असणार आहे, त्यामुळे पर्यावरणासंबंधीची म्हणजेच वातावरणातील बदलांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. इमर्जन्सी कॉल बॉक्स आणि पब्लिक डरेसिंग सिस्टमही असणार आहे. त्यामुळे इमर्जन्सीच्यावेळी नागरिकांना तात्काळ मदत मिळण्यात आणि धोक्याची सूचना तात्काळ पोहोचण्यास मदत होणार आहे.

संपुर्ण शहरात स्मार्ट एलईडी स्ट्रीटलाईट बसविण्यात येणार आहेत, त्याच्या लाईटचा प्रकाश नियंत्रण, चालु बंद,स्वयंचलित पध्दतीने करण्यात येणार आहे. ६० टक्क्यांपेक्षा जास्त विजेची बचत यामुळे होणार आहे. यासर्व स्मार्ट सर्व्हिसेसला कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरव्दारे शहराचे पर्यवेक्षण व नियंत्रण करण्यात येणार आहे.

मोठया व्हिडीओ वॉलवर नाशिक शहरातील एएमआर स्काडा वॉटर मीटर, सीसीटीव्ही, स्मार्ट एलईडी स्ट्रीट लाईट, स्मार्ट पार्किंग, बस सर्व्हिस वाहतुक यंत्रणेसाठी आयटीएमएस या सर्व सर्व्हिसेस विविध सेंन्सर्स व ऑप्टीकच्या माध्यमातुन या नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येऊन कॉमन प्लॅटफार्मवर आणण्यात येणार आहे. यासर्व प्रणालींचा डेटाबेसचे पृथ्थकरण करुन शहरातील विविध सर्व्हिसेस पर्यवेक्षन व नियंत्रण करण्यात येणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!