मतदार साक्षरता क्लब स्थापन

सिन्नर महाविद्यालय: व्हीव्हीपॅट यंत्र वापरावर तहसीलदार गवळी यांचे विद्यार्थ्यांना प्रबोधन

0
सिन्नर |प्रतिनिधी ईव्हीएम व व्हीव्ही पॅट यंत्रात आधुनिक तंत्राचा अवलंब करण्यात आला असून लोकशाहीचा कणा असणार्‍या निवडणूक प्रक्रिया यामुळे गतिमान व पारदर्शी होणार आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण करणार्‍या प्रत्येक युवक-युवतीने निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत नाव नोंदणी करणे व निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करणारे हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे प्रतिपादन तहसीलदार नितीन गवळी यांनी केले.
सिन्नर महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग आणि तहसील कार्यालयातील निवडणूक शाखा यांच्या विद्यमाने मतदार साक्षरता क्लबची स्थापना करण्यात आली असून. या क्लबच्या उदघाटन प्रसंगी गवळी बोलत होते.
प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार नरेंद्र वाघ, उपप्राचार्य प्रा आर् व्ही पवार, प्राध्यापिका शकुंतला गायकवाड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.अरुण पोटे , प्रा राजेंद्र अगवाने , प्रा पि के शिंदे, श्रीमती ए आर पगार, प्रशिक्षक विकास अरगडे, विजय वाजे यावेळी उपस्थित होते.
गवळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ईव्हींएम व व्हिव्हिपॅट यंत्रणेचे फायदे समजावून सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर निवडणूक आयोगाने वेळोवेळी निवडणूका सुरळीत पार पाडण्यासाठी केलेला असून नवीन इलेक्ट्रॉनिक्स मतदान पद्धतीमध्ये पारदर्शकतेमुळे मतदान करणे व मतमोजणी करणे कसे सोपे झाले असल्याचे ते म्हणाले.
इलेक्ट्रोनिक मतदान यंत्राचा प्रथम वापर १९८२ मध्ये केरळ राज्यात करण्यात आला. जुन्या प्रचलित पद्धतीने मतपत्रिकेचा आधारे जेव्हा मतदान घेण्यात यायचे तेव्हा मतमोजणीस अडचणींना सामोरे जावे लागत होते .
मात्र आता तंत्रज्ञानामुळे हि संपूर्ण प्रक्रिया सुलभ झाली आहे. ईव्हीएम यंत्रावर आपण केलेले मतदान आतापर्यंत केवळ लाल दिवा लागला आहे त्यावरून समजले जात होते. परंतु आता ईव्हीएमसह व्हीव्हीपॅटमुळे आपण ज्या उमेदवाराला मतदान केले आहे त्याची स्लीप सात सेकंदासाठी यंत्रातील स्क्रीनवर दिसणार आहे. त्यामुळे मतदानाची खात्री व विश्वास निर्माण होणार आहे.
विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी नमुना फॉर्म नं ६, ७ व ८ आवश्यक कागदपत्रासह भरून दिल्यानंतर मतदार यादीमध्ये नाव दाखल करता येते असे तहसीलदार गवळी यांनी याप्रसंगी आवाहन केले.
लोकशाहीला सुदृढ बनवण्यासाठी युवकांनी जागृत राहणे आवश्यक आहे. त्यासाठी वर्तमानपत्रांचे वाचन, राजकीय प्रक्रियेविषयी माहिती समजून घेणे आवश्यक आहे ज्या विद्यार्थ्यांना १ जानेवारी २०१९ रोजी अठरा वर्ष पूर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्याना मतदार नाव नोंदणी करण्याचे आवाहन प्राचार्य शिंदे यांनी केले.
महाविद्यालयातील तरुणांनी निवडणूक प्रक्रिया विषयी जागृतता दाखवावी व निरपेक्ष पद्धतीने मतदान करावे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांचे योगदान महत्वाचे आहे . मतदार साक्षरता क्लब निर्मितीतून नवमतदारांमध्ये जागृती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मास्टर ट्रेनर विकास आरगडे विजय वाजे, यु. व्ही. जाधव यांनी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवले . सुमारे ५५० विद्यार्थ्यांनी या यंत्रांवर होणारी मतदानप्रक्रिया समजावून घेत मतदार यादीतील समावेशासाठी अर्ज भरून दिले.
क्लबच्या माध्यमातून मतदार जागृती व नोंदणीच्या मोहिमेअंतर्गत वर्षभर विविध उपक्रम घेतले घेतले जाणार असून त्यात मतदार जागृती रॅली, निबंध, रांगोळी, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे, ग्रामीण भागात मतदारांना जागृत करण्याचे कार्य पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांकडून करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*