Friday, April 26, 2024
Homeनाशिकसिन्नर-पांगरी : आठ दिवसांपासून ट्रान्सफार्मर नादुरुस्त

सिन्नर-पांगरी : आठ दिवसांपासून ट्रान्सफार्मर नादुरुस्त

पांगरी । वार्ताहर

येथील १४ क्रमांकाचा ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाला आहे. आठ दिवस होऊनही तो दुरुस्त करून बसविला जात नसल्याने शेतकर्‍यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तातडीने ट्रान्सफार्मर बसविण्याची मागणी महावितरणला दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

- Advertisement -

पंचायत समिती सदस्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवींद्र पगार यांनी हे निवेदन महावितरणचे उपअभियंता ऋषिकेश खैरनार यांना दिले. शिवाजी पवार, अशोक पगार, भीमा पवार, अण्णासाहेब पवार, भाऊसाहेब पवार, ज्ञानेश्वर पवार, रमेश पवार, सुभाष पवार, दत्तू साबळे, विठ्ठल पवार आदी शेतकरी उपस्थित होते.

कुर्‍हाडे वस्तीवरील १०० अ‍ॅम्पिअर क्षमतेचा ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाला. त्याच्या दुरुस्तीसाठी शेतकर्‍यांनी रोज महावितरणचे कर्मचारी, अधिकार्‍यांशी संपर्क साधला. आठ दिवस झाले तरीही नादुरुस्त ट्रान्सफार्मर दुरुस्त करून बसविण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांत संताप व्यक्त केला जात आहे.

पावसाने रब्बीबाबत आशा पल्लवित केल्या असतानाचा महावितरणच्या कारभारामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पाणी असूनही केवळ विजेअभावी गहू, मका, कांदा पिके सुकू लागली असून ती उद्ध्वस्त होण्याची स्थितीत आहेत. वरिष्ठ पातळीवरून याबाबत तातडीने दखल घेण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या