कोठडीतील कैद्याची आत्महत्या दोघा पोलिसांना भोवली

0

सिन्नर , वार्ताहर शनिवारी दि.२५ दुपारी सिन्नर पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या तरुणाने कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकाराला जबाबदार धरत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ठाणे अंमलदार व जेल गार्ड म्हणून कर्तव्यावर असलेल्या दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

महिलेच्या विनयभंगाच्या गुन्ह्यात संशयित असणाऱ्या सोन्या उर्फ डीचक दौलत जाधव रा. जोशीवाडी, सिन्नर याने शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कोठडीतच आत्महत्या केली होती. या प्रकरणात जबाबदार धरून घटना घडली त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या ठाणे अंमलदार नितीन  मंडलिक व जेल गार्ड बाळासाहेब झनकर या दोघा हवालदारांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
मृतदेह ताब्यात घ्यायला नकार
आज दि.२६ सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आलेला सोन्याचा मृतदेह सिन्नरला दाखल झाला. मात्र संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घ्यायला नकार दिल्याने पोलीस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण रात्री उशिरापर्यंत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले यांचेसह वरिष्ठ अधिकारी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते.

LEAVE A REPLY

*