Thursday, April 25, 2024
Homeनाशिक‘सिल्व्हर लेक’ जिओमध्ये ५६५५ कोटींची गुंतवणूक करणार

‘सिल्व्हर लेक’ जिओमध्ये ५६५५ कोटींची गुंतवणूक करणार

जिओमध्ये दोन आठवड्यात दोन मोठ्या गुंतवणूकी

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

सिल्व्हर लेक कंपनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ५६५५.७५ कोटींची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणूकीच्या बदल्यात सिल्व्हर लेकला साधारणतः १.१५% इक्विटी मिळेल. यापूर्वी २२ एप्रिल रोजी फेसबुकने जिओमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. सिल्व्हर लेकच्या गुंतवणूकीत जिओ प्लॅटफॉर्मचे इक्विटी मूल्य अंदाजे ४.९० लाख कोटी रुपये आहे. हे फेसबुकने लावलेल्या मूल्यापेक्षा १२.५% जास्त आहे.

जिओ प्लॅटफॉर्म ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. जिओ ही पुढील पिढीची तंत्रज्ञान कंपनी आहे जी भारतातील हाय स्पीड कनेक्टिव्हिटी नेटवर्कसह डिजिटल इको सिस्टम, डिजिटल अॅपवर काम करते. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडच्या नेटवर्कवर ३८८ दशलक्षाहूनही अधिक ग्राहक आहेत. दरम्यान, सिल्व्हर लेक जगभरात ४० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती सांभाळते. यात एअरबीनबी, अलिबाबा, अँट फायनान्शियल, अल्फाबेट्स टूअर आणि वेमो युनिट्स, डेल टेक्नॉलॉजीज, ट्विटर यासारख्या बड्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.

कोरोना विषाणूच्या साथीमुळे संपूर्ण जग आणि भारत गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध टेक गुंतवणूकदारांपैकी सिल्व्हर लेकची ही गुंतवणूक बर्‍याच प्रकारे अर्थपूर्ण आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सर्वसमावेशक डिजिटायझेशन आणि रोजगारनिर्मिती आवश्यक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

सिल्व्हर लेकच्या भागीदारीवर भाष्य करताना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, “भारतीय डिजिटल इको-सिस्टमच्या विकासासाठी सिल्व्हर लेकचे महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून स्वागत करताना मला आनंद होत आहे. याचा फायदा सर्व भारतीयांना होईल. सिल्व्हर लेककडे जागतिक स्तरावर आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांसह भागीदारीचा उत्कृष्ट इतिहास आहे. सिल्व्हर लेक तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रातील एक अत्यंत प्रतिष्ठित संस्था आहे. आम्ही उत्सुक आहोत की भारतीय डिजिटल सोसायटीचे कायापालट करण्यासाठी आम्ही सिल्व्हर लेकच्या जागतिक कनेक्शनचा लाभ घेण्यास सक्षम होऊ. ”

सिल्व्हर लेकचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय भागीदार एगॉन डर्बन यांनी जिओचे कौतुक करताना म्हटले आहे की, “जिओ प्लॅटफॉर्म ही जगातील सर्वात उल्लेखनीय कंपन्यांपैकी एक आहे, ज्याच्या नेतृत्वात एक अविश्वसनीय मजबूत आणि उद्योजकीय व्यवस्थापन संघ आहे.” मुकेश अंबानी आणि रिलायन्स जिओच्या टीमबरोबर जिओ मिशनला मदत करण्यासाठी आम्ही भागीदार झाल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. “

- Advertisment -

ताज्या बातम्या