Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘शेतकरीसेवार्थ’ संकेतस्थळाचे ना. भुसे यांच्या हस्ते अनावरण

Share
'शेतकरीसेवार्थ' संकेतस्थळाचे ना. भुसे यांच्या हस्ते अनावरण; ShetkariSevarth website launched

कृषी सहाय्यकांच्या पुढाकाराने संकेतस्थळ विकसित

नाशिक । प्रतिनिधी

राज्यातील शेतकऱ्यांना नवनवीन कृषी तंत्रज्ञान, कृषी विषयक घडामोडी, संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे याबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी सुकदेव जमदाडे (बीड) आणि प्रदीप भोर (सिन्नर) या कृषी सहाय्यकांनी विकसित केलेल्या शेतकरीसेवार्थ या संकेतस्थळाचे अनावरण राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत कृषी विभागाच्या जिल्हा आढावा बैठकीत शेतकरीसेवार्थ / www.shetkarisewarth.in सोबतच कृषी सहाय्यक संघटनेच्या www.msaau.org या संकेतस्थळाचे देखील अनावरण करण्यात आले. जमदाडे आणि भोर यांनी शेतकऱ्यासांठी उपयुक्त असणाऱ्या संकेतस्थळाची निर्मिती केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक यावेळी ना. भुसे यांनी केले.

नाशिक विभागाचे कृषी सहसंचालक संजीव पडवळ, कृषी अधीक्षक अधिकारी सुनिल वानखेडे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांच्या मार्गदर्शनखाली हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून त्यासाठी वरील दोघा कृषी सहाय्यकांनी परिश्रम घेतले. याशिवाय कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांना कार्यालयीन कामासाठी आवश्यक असलेली शासन निर्णय, परिपत्रक, प्रपत्र, मार्गदर्शक सूचना, योजनांची माहिती, कार्यालयीन आदेश, प्रशिक्षण, अंदाज पत्रक, प्रकल्प अहवाल, विविध योजनाचे अर्ज इत्यादी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी www.msaau.org या संकेतस्थळाची देखील निर्मिती करण्यात आली आहे.

राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे माजी अध्यक्ष राहुल राऊत, सोमनाथ बाचकर, कार्याध्यक्ष धनु सोनुने, सरचिटणीस वसंत जरीकोटे, राज्य प्रतिनिधी बापूसाहेब शेंडगे, जिल्हा अध्यक्ष शरद थेटे, अरविंद आढाव यांचे सहकार्य या उपक्रमासाठी मिळाले आहे. कृषी सहाय्यक जमदाडे, भोर हे सोशल मिडिया वर शेतकऱ्यांच्या प्रबोधन आणि मार्गदर्शनासाठी प्रयत्नशील असतात. यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने सन २०१८ मध्ये त्यांचा सोशल मिडिया महामित्र म्हणून गौरव केला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!