Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशेल्टर प्रदर्शनात दीडशे कोटींची उलाढाल

शेल्टर प्रदर्शनात दीडशे कोटींची उलाढाल

नाशिक । प्रतिनिधी

वैभवशाली वारसा असलेल्या नाशिक शहराची कनेक्टीव्हिटी वाढली असून शहराच्या विकासासाठी तसेच प्रसिद्धीसाठी जनता, उद्योजक व लोकप्रतिनिधी एकत्र आल्यास निश्चित उद्दिष्ट साधता येते. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी शहराच्या विकासासाठी कटीबद्ध आहोत अशी ग्वाही क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित शेल्टर प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी सर्व लोक प्रतिनिधींनी दिली. या प्रदर्शनात ५०० सदनिकांची विक्री झाली असून सुमारे दीडशे कोटींची उलाढाल झाली.

- Advertisement -

यावेळी मंचावर महापौर सतीश कुलकर्णी खा. हेमंत गोडसे, खा. डॉ. भारती पवार, आ. देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, उपमहापौर भिकूबाई बागुल, माजी खा. प्रतापदादा सोनावणे, क्रेडाई चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव पारीख, नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक जितुभाई ठक्कर, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे, प्रदर्शनाचे समन्वयक रवि महाजन व सहसमन्वयक कृणाल पाटील उपस्थित होते.

आपल्या प्रास्ताविकात क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे म्हणाले की, क्रेडाई नाशिक मेट्रोने नेहमीच नाशिकच्या ब्रांन्डींग साठी सकारात्मक पाऊले उचलले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वॉव नाशिक नाऊ नाशिक या संकल्पनेवर एक आंतरराष्ट्रीय दर्जाची चित्रफित या प्रदर्शनाच्या निमित्ताने तयार करण्यात आली. तसेच रस्ते अधिक शहरांसाठी विमानसेवा, टायर बेस मेट्रो, युनिफाईड डीसीपीआर याच्या पूर्ततेकडेही त्यांनी लक्ष वेधले.

प्रदर्शनाचे समन्वयक रवि महाजन म्हणाले, शेल्टर च्या यशाचा दूरगामी परिणाम नाशिकचे अर्थकारण व विकासावर होणार असून यामुळे अनेक संधी तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीस हातभार लागणार आहे. आंतरराष्ट्रीय सुविधा असलेल्या चार डोम मधील 100 हून अधिक विकसक, ५०० हून अधिक प्रकल्प, सर्व आघाडीच्या अर्थसहाय्य करणार्‍या संस्था तसेच बांधकाम साहित्याच्या संस्थांच्या सहभागामुळे येथे आलेल्या नागरिकांना निर्णय घेणे सोपे झाले. या चार दिवसात बुकिंग बरोबरच अनेकांनी प्रत्यक्ष साईट व्हिजीट देखील केल्याचे त्यांनी सांगितले.

आभार सह समन्वयक कृणाल पाटील यांनी मानले. प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी संयोजन समितीचे अनिल आहेर, अतुल शिंदे, हितेश पोतदार, ऋषिकेश कोते, नरेंद्र कुलकर्णी, राजेश आहेर, सचिन चव्हाण, अंजन भलोदिया, गौरव ठक्कर, राजेश पिंगळे, भाग्यश्री तलवारे, शुभम राजेगावकर, श्रेणिक सुराणा, मनोज खिंवसरा आदी सदस्य परिश्रम घेतले.

६० हजार नागरीकांची भेट
या चार दिवसीय प्रदर्शनास नाशिक जिल्ह्यासहित धुळे, नंदुरबार, जळगाव, ठाणे, मुंबई, पुणे, अहमदनगर मालेगाव, येथून ६० हजारहून अधिक नागरिकांनी भेट दिली. प्रदर्शन कालावधीत ५०० हून अधिक सदनिकांची विक्री करण्यात आली. तर याची एकूण उलाढाल १५० कोटी एवढी झाली. याव्यतिरिक्त प्रदर्शनात झालेल्या चौकशी नंतर सुमारे ३ हजार सदनिकांची विक्री येत्या ३ महिन्यात होईल अशी अपेक्षा आहे. या प्रतिसादामुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे.

जगभरात नाशिकचा प्रचार
‘वॉव नाशिक, नाऊ नाशिक ‘ या संकल्पनेवर एक आंतरराष्ट्रीय दर्जाची चित्रफित या प्रदर्शनाच्या निमित्ताने तयार करण्यात आली. यामध्ये संरक्षण सामग्री निर्माण, सैन्य प्रशिक्षण, फळे व भाजीपाला, जेनेटिक संशोधन केपिओ, उत्कृष्ठ शिक्षण संस्था, वाहन निर्मिती, वाईन कॅपिटल, बायोटेक्नोलॉजी संशोधन, वेअर हौसिंग, उत्कृष्ट वैद्यकीय सुविधा, देशातील सर्वोत्कृष्ट घन कचरा व्यवस्थापन, देशातील सर्वात स्वच्छ हवेचे ठिकाण अशांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. सदर फिल्म नाशिक ब्रांन्डींगचाच भाग म्हणून या प्रदर्शानानंतर जगभरात व्हायरल करण्यात येणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले

शल्टर प्रदर्शनात मोठा प्रतिसाद मिळाला. लोकांच्या साईट व्हीजीट मोठ्या प्रमाणात झाल्या तसेच प्रत्येक व्यावसायीकांचे बुकिंगही अतिशय चांगल्या प्रकारे झाले आहे. आमच्या संस्थेलाही याचा मोठा लाभ झाला आहे.
– प्रविणभाई, क्रीश ग्रुप 

आम्ही गोदरेजसह सर्व प्रतिष्ठित कंपन्याचे सुरक्षा साहित्याचा स्टॉल लावला होता . ग्राहक तसेच बांधकाम व्यावसायिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
– अनिल सचदेव, गोवर्धनदास

गेल्या आठ वर्षांपासून आम्ही नाशिकमध्ये काम करतो आहोत. शल्टर एक लोक फिरायला न येता खास खरेदीसाठीच आले असल्याचे दिसून येत होते. नाशिककरांनी  अतिशय बारकाईने घरे, फ्लॅट, बंगले यांची चौकशी केली . आम्हा सर्व व्यावसायिकांना पुढील तीन महिन्यात याचा खरा लाभ दिसून येणार आहे. शल्टरची तयारी उत्तम होती.
– ऋषीकेश कोतेकर, राम कंट्रक्शन

शल्टर आता नाशिकची नवी ओळख होत आहे. मागील दोन वर्षात बांधकाम असलेली मंदी समजुन ही तेजीची नांदी आहे. सर्व विभागातील घरांना नाशिककरांचा अतिशय चांगला प्रतिसाद लाभला आहे. नाशिककर अतिशय चोखंदळ असून त्यांना हवे तशी घरे शल्टरमध्ये पाहावयास मिळाली आहेत.छोटे फ्लॅट व रो हाऊसेससाठी आम्हाला खुप प्रतिसाद मिळाला.
– शंतनु देशपांडे, निशम डेव्हलपर्स

प्रदर्शनात प्रॉपर्टीजच्या बारकाईने चौकश्या लोकांनी मोठ्या प्रमाणात केल्या, आमच्या पाथर्डी फाटा, गंगापूर रोड,लव्हाटेनगर, पाईपलाईन रोड येथे साईट सुरू आहेत. या प्रदर्शनात आमच्या फर्मला खुप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शल्टर हे बिल्डर व नागरीक यांच्यामधील सेतु ठरले असून याचा सर्वांनाच चांगला लाभ होत आहे.
– आर. बाविस्कर, रविंद्र डेव्हलपर्स

आमची २५ वर्षे जुनी फर्म असून आम्ही आतापर्यंत ४ हजार पेक्षा जास्त प्लॉट विकेल आहेत. आम्ही दोन वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात आलो आहोत. लोकांची मानसिकता बदलली आहे. शल्टरचा यात मोठा सहभाग आहे. या प्रदर्शनात आमचे ४ फ्लॅट विकले गेले आहेत.
– सुधीर गुप्ता, सुर्या प्रापर्टिज

- Advertisment -

ताज्या बातम्या