Friday, April 26, 2024
Homeनाशिकसगुण विकास प्रकल्पाच्या अंतर्गत १५०० शाळांची निवड

सगुण विकास प्रकल्पाच्या अंतर्गत १५०० शाळांची निवड

नाशिक । प्रतिनिधी

केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने सहकार्यातून शैक्षणिक विकास या उद्देशाने सगुण कार्यक्रमात जिल्ह्यातील १५०० कमी प्रगत असलेल्या शाळा व नजीकच्या प्रगत १५०० शाळांना जोडण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

दोन शाळांमधील परस्पर सवांद साधने,सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधीसाठी सामाईक पातळीवर एकत्र आणणे, अनुभवाची देवाण घेवाण व अध्ययन प्रक्रियेचा आनंद घेणे,शाळा-शाळा मध्ये मैत्रीपूर्ण व सहकार्याचे वातावरण निर्मिती करणे,स्वताच्या व इतरांच्या सामर्थ्य व कमतरता यांच्यात दुवा साधून एकत्रित सर्वांचा विकास साध्य करणे,शिक्षण क्षेत्रातील घटकांना उत्कृष्ट व परिणामकारक पद्धतीचा स्विकार करण्याची संधी निर्माण करणे. या उद्देशाने नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या व्यवस्थापनाच्या १५०० शाळांना व जिल्हा परिषदेच्या १५०० शाळांना जोडण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर,ज्येष्ठ अधिव्याख्याता योगेश सोनवणे यांच्या मार्गदर्शन नुसार सगुण प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.यामुळे जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती निर्माण होणार आहे,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सगुण प्रकल्प शैक्षणिक बदलाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.निकोप व मैत्रीपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शिक्षणाची संधी या माध्यमातून प्राप्त होणार आहे. –ज्ञानेश्वर क्षीरसागर ,विशेष तज्ञ, समावेशीत शिक्षण नाशिक.

सगुण विकास कार्यक्रम(सहकार्यातून गुणवत्ता विकास) कार्यक्रमामुळे जिल्हा व तालुका गुणवत्ता कक्ष बैठकांना महत्व प्राप्त होणार आहे.सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामात वस्तूनिष्ठता व पारदर्शकता येणार आहे.लक्ष्य निर्धारित काम करण्याची प्रेरणा निर्माण होणार आहे.तसेच राष्ट्रीय पातळीवरील मूल्यांकनात राज्याचा जिल्ह्याचा दर्जावाढ होण्यास मदत होणार आहे.
योगेश सोनवणे, ज्येष्ठ अधिव्याख्याता (गट-अ)  समन्वयक, सगुण विकास प्रकल्प नाशिक.

कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकामध्ये शासकीय व्यवस्थापन प्रणाली या क्षेत्रामधील शाळा भागीदारी या दर्शकातील कामगिरी उत्कृष्ट होण्यासाठी यामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक स्तरावरील कमीत कमी पन्नास टक्के शाळा(सुमारे १५००) सहभागी करून जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे.
– डॉ. वैशाली झनकर (विर) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या