Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशिष्यवृत्ती परीक्षा १६ फेब्रुवारीला

शिष्यवृत्ती परीक्षा १६ फेब्रुवारीला

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रात परीक्षा केंद्रांचा पत्ता चुकल्याची बाब समोर आली. दरम्यान, परीक्षा केंद्राचे योग्य पत्ते संबंधित शाळांना कळविण्यात येतील, असे राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

या परीक्षेसाठी दोन पेपर असतील. पहिला पेपर सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा या वेळेत होईल. यात प्रथम भाषा विषयाचे २५ प्रश्न असतील, त्याला ५० गुण; तर गणित विषयातील ५० प्रश्नांसाठी १०० गुण, असा एकूण १५० गुणांचा पेपर असेल. या परीक्षेचा दुसरा पेपर दुपारी दीड ते तीन या वेळेत होईल.

तृतीय भाषा विषयात ५० गुणांचे २५ प्रश्न, तर बुद्धिमत्ता चाचणीचे १०० गुणांचे ५० प्रश्न असतील. पाचवी आणि आठवीच्या परीक्षेसाठी वेगवेगळी परीक्षा केंद्रे असतील.परीक्षा केंद्रे ही विविध शाळांमध्ये देण्यात आली आहेत. त्यांचा पत्ता परिषदेने परीक्षेच्या प्रवेशपत्रावर दिलेला आहे. अनेक प्रवेशपत्रांवर परीक्षा केंद्राच्या शाळेचा पत्ता अर्धवट आणि चुकल्याच्या बाबी समोर आल्या आहेत. शाळेचे नाव, तालुका आणि जिल्हा एवढाच पत्ता दिला आहे. काही प्रवेशपत्रांवर शाळांचा कोड दिलेला असला, तरी विद्यार्थी वा त्यांच्या पालकांनी शाळा कशी शोधायची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या