Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

एससी प्रवर्गातील २ लाख १५ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ

Share
शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत चुका; Mistakes in the scholarship exam question paper

नाशिक । अजित देसाई

राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये मॅट्रिकोत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय प्रवर्गातील २ लाख १४९५० विद्यार्थ्यांना सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी ६१६.८७ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना व राज्य सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, परीक्षा फी प्रतीपुर्ती योजनेच्या लाभापोटी डिसेंबर २०१९ अखेर समाजकल्याण विभागाच्या वतीने नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार व धुळे या जिल्ह्यांतील २४९५७ विद्यार्थ्यांना ६७.८६ कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यावर थेट वितरित करण्यात आले आहेत.

एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने अर्ज भरून घेण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी राज्यातील ४ लाख ७६ हजार ११७ विद्यार्थ्यांनी शासनाच्या संकेतस्थळावरून हे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ८५ टक्के म्हणजेच ४ लाख २४८९ अर्ज डिसेंबर अखेरपर्यंत स्वीकृत करण्यात आले होते.त्यापैकी शिक्षण संस्था पातळीवरून ३ लाख ४०३२४ अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठवल्यावर कार्यालय स्तरावर २ लाख ५५ हजार १७१ ( ७५%) अर्जांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी २ लाख १४९५० विद्यार्थ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे ६१६.८७ कोटी रुपये वितरित करण्यात आले.

याशिवाय विद्यावेतन आणि राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेतून देखील ३.५७ कोटी रुपयांचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात आला. विद्यावेतनासाठी मागणी करणार्‍या ४१३६ पैकी ५६२ विद्यार्थ्यांना ३७ लाख रुपये देण्यात आले तर राजर्षी शाहू योजनेतील १९२४२ पैकी १०६६१ विद्यार्थ्यांना ३.२० कोटींच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!