Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी मंडई पूर्ववत सुरु करण्याची गाळेधारक व्यवसायिकांची मागणी

सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी मंडई पूर्ववत सुरु करण्याची गाळेधारक व्यवसायिकांची मागणी

सातपूर । प्रतिनिधी

सातपूर परिसरातील सातपूर गाव येथील श्री छत्रपती शिवाजी मंडई व सातपूर कॉलनी येथील भाजीबाजार बंद असल्याने परिसरातील नागरिकांना भाजी खरेदी साठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. सातपूर गावात बॅरिकेटिंगच्या आत मध्ये भाजी बाजार भरला जात आहे त्यामुळे परिसरात सकाळी सात ते नऊ वाजेच्या दरम्यान प्रचंड गर्दी होते यात कुठेही सोशल डिस्टनसिंगची काळजी घेतली जात नाही.

- Advertisement -

यासोबतच प्रशासनाने सर्व व्यवसायिकांना मुभा दिलेली असल्याने बाजारपेठा उघडल्या आहेत मात्र श्री छत्रपती शिवाजी मंडईच्या प्रवेशद्वाराला सील लावलेले असल्याने मंडईतील सुमारे १३० गाळेधारक व्यवसायिकांची अडचण झालेली आहे याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे व मंडईची दरवाजे खुले करावे अशी मागणी गाळेधारक व्यवसायिकांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी मंडई चे दोन प्रवेशद्वार सीलबंद केले असले तरी एका गेटच्या खालून तुटलेल्या भागातून नागरिक खुलेआम जात आहेत सायंकाळच्या वेळी या ठिकाणी विद्युत पुरवठा नसल्याने गैर उद्योगांना ऊत आलेला आहे याठिकाणी बंद असलेल्या भाजी दुकानांची उस्तर-पास्तर केली जात आहे बंद असलेल्या व्यापाऱ्यांची दुकाणे यामुळे धोक्यात असल्याने प्रशासनाने तातडीने यावर लक्ष द्यावे अशी मागणी सातपूर श्री छत्रपती शिवाजी मंडई , सातपुर ,व्यापारी असोसिएशन च्या वतीने करण्यात आली आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या