Type to search

नाशिक

सातपूर कॉलनीतील टपाल कार्यालयाच्या रिक्त भूखंडावर इमारत बांधण्यासाठी निवेदन

Share
सातपूर कॉलनीतील टपाल कार्यालयाच्या रिक्त भूखंडावर इमारत बांधण्यासाठी निवेदन; Request for construction of a building on the vacant plot of the post office in Satpur Colony

नाशिक | प्रतिनिधी 

सातपूर कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट शेजारी टपाल विभागाचा एक मोकळा आरक्षित भूखंड आहे. ह्या जागेवर दरम्यान ३० वर्षांपासून इमारत उभारणी झालेली नाही.ह्या ठिकाणी टपाल विभागाच्या मालकीच्या जागेत इमारत उभी राहावी ह्या मागणी साठी  खा.हेमंत गोडसे ह्यांचेशी संपर्क साधून टपाल विभागाच्या कार्यालय उभारणी बाबतचे लेखी निवेदन देण्यात आले.सदर निवेदनावर नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आजी-माजी नगरसेवक/ नगरसेविका यांनीही  पाठपुरावा केला आहे.

या वेळी निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पुणतांबेकर ,माजी सभापती दिनकर पाटील, सभापती उद्धव निमसे, नगरसेवक तानाजी जायभावे, सप्तशृंगी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसन खताळे, प्रकाश महाजन, चंद्रकांत निर्वाण, शांताराम पाटील, शांताराम जमदाडे, यादवराव वानखेडे निवेदन देताना उपस्थित होते.

दरम्यान, खा.हेमंत गोडसे यांनी टपाल कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणार असल्याचे निवेदन स्विकारताना सांगितले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!