Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

देवमामलेदार स्मारकासाठी पर्यटन विभागातर्फे निधी

Share

सटाणा । प्रतिनिधी 

शहरातील देवमामलेदार स्मारक, भाक्षी रोडवरील साई मंदिर व सभागृहाचे कामासाठी पर्यटन विभागातर्फे १ कोटी ३९ लाखाचा निधी शासनाने मंजूर केला आहे. या निधीमुळे शहराच्या पर्यटन विकासास चालना मिळेल, अशी माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.

सटाणा शहरातील अध्यात्मिक, धार्मिक स्थळांनाही विशेष महत्त्व असून या पुरातन गौरवशाली वारशाचे संवर्धन करण्यासाठी होत असलेल्या पाठपुराव्यामुळे देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारकासाठी शासनाने यापूर्वी पर्यटन विभागामार्फत ३ कोटी ८६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे देवमामलेदार स्मारक हे राज्यभरातील एक महत्वाचे पर्यटन केंद्र ठरेल अशा पद्धतीने विकासाचे काम होत असून अंतर्गत सौंदर्य आणि सुशोभीकरणासाठी विशेष लक्ष दिले जात असल्याची माहिती मोरे यांनी पुढे बोलतांना दिली.

शासनाकडून यापूर्वी निधी प्राप्त झालेला असला तरी अधिक निधीसाठी पर्यटन विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पुन्हा दुसर्‍यांदा १ कोटी ३९ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील चावडीवरील राम मंदिर परिसराचा जीर्णोद्धार करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ६३ लक्ष रुपये निधी खर्च होईल तर ४१ लक्ष रुपये निधीतून भाक्षी रोडवरील साई मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. नववसाहत परिसरात भाक्षी रोड भागात दादासाहेब रावल सभागृह विकासासाठी ३५ लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल व खा.डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून शासनाकडून शहरातील पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करण्यात यश आले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष मोरे यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!