Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक सायक्लिस्टस् फाऊंडेशनची सप्तरंग राइड

Share
नाशिक सायक्लिस्टस् फाऊंडेशनची सप्तरंग राइड ; Saptrang Ride By Nashik Cylist Foundation

नाशिक । प्रतिनिधी

आरोग्याच्या दृष्टीने सायकल चालविणे लाभदायक असल्याने गेल्या दशकभरात सायकलपटूंचे प्रमाण वाढले आहे. त्यातच सततच्या धावपळीच्या जीवनातून वेळातवेळ काढून सर्वांना सोबत घेऊन दर महिन्याला सायकल राइड्सदेखील घेतल्या जात असून, नाशिक सायक्लिस्टस् फाऊंडेशन ची एन. आर. एम. राईड शनिवारी (दि.१४) ४.३ सप्तरंग राइडचे आयोजन करण्यात आले होते. या राइडमध्ये अनेक सायकलपटूंनी सहभाग घेत आरोग्य सृदृढतेचा संदेश दिला.

शहरातील डोंगरे वसतिगृहलगत असलेल्या शिवशक्ती सायकलच्या दालनापासून सकाळी सहा वाजेला सप्तरंग राइडला प्रारंभ करण्यात आला. यावेळी ४० आणि ८० किलोमीटर अशा दोन राइड आयोजित करण्यात आल्या होत्या, नाशिक ते ओझर (४० किलोमीटर), नाशिक ते शिरवाडे वणी फाटा (८० किलोमीटर) हून नाशिकला परत अशा या दोन राइड होत्या, अशी माहिती आयोजक एन. आर. एम. ४.३ ग्रुपचे समन्वयक प्रशांत भागवत यांनी दिली.

सध्या रंगाचा उत्सव होळी नुकताच पार पडल्यामुळे यावेळी या राइड्सला सप्तरंग नाव देण्यात आले होते. एन. आर. एम. तर्फे दर महिन्याला या राइडचे आयोजन करण्यात येत असून, यावेळी आयोजित राइड ही परतताना मुंबई नाक्यावरील प्रिंप्रीकर हॉस्पिटलपर्यंत निश्चित करण्यात आली होती.

सहभागी सायकलपटूंनी ही राइड कमीत – कमी वेळात पूर्ण केली. जवळपास ३५ हून अधिक सायकलपटूंनी यामध्ये सहभाग घेतला होता, दिव्यांग सायकलपटू सुनील पवार, नरेंद्र देसले यांनी देखील ४० किलोमीटर राइडमध्ये सहभाग घेऊन इतर सदस्यांप्रमाणे वेळेत ही राइड पूर्ण केली.

या राईड्समध्ये एन. आर. एम. चे प्रसाद रहाणे, रणजीत वाढणे, सोपीया कापडिया, नंदा गायकवाड, नितीन कोतकर यांच्यासह एन. सी. एफ. चे अध्यक्ष रत्नाकर आहेर, सचिव नंदकुमार पाटील यांच्यासह पॅरीस ब्रेस्ट पॅरीस व डी.सी.पूर्ण केलेले सायकलिस्ट निता नारंग, नीलेश झवर, डि. सि. पी. गिता चव्हाण आदी सहभागी झाले होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!