सचिन आडसरे यांना आंतर राष्ट्रीय पातळीवरील ” युवा शास्त्रज्ञ” पुरस्कार

jalgaon-digital
4 Min Read

करंजी खुर्द |वार्ताहर

करंजी खुर्दचे भूमिपुत्र श्री सचिन आडसरे यांना स्प्रिंजर नेचर (Springer-Nature) या आंतर राष्टीय पातळीवरील प्रतिष्टित संस्थेच्या ” युवा शास्त्रज्ञ ” या पुरस्काराने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. निफाड तालुक्यातील करंजी खुर्दसह संबंध नाशिक जिल्ह्याचा हा सन्मान असून हि अभिमानास्पद बाब ठरली आहे.

मुंबई येथील अन्नतंत्र अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभाग, रसायन तंत्रज्ञान संस्था (ICT Mumbai ) येथे प्रा. उदय श्री. अन्नपूरे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन यांनी ” “नोवल इन्ग्रेडीएन्ट्स फ्रॉम कोकोनट इंडस्ट्रियल वेस्ट ” या क्षेत्रात संशोधन केले आहे. भारत सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकाचा नारळ उत्पादन करणारा देश असून सद्यस्थितीत ५०% उत्पादन हे घरगुती वापर आणि मंदिर देवस्थानासाठी, ३५% ऑइल उत्पादनासाठी, १०% नारळ हे आरोग्यदायी पेय म्हणून तर फक्त २-३ % उत्पादन हे इतर किंवा अपारंपरिक उत्पादनासाठी वापरले जाते. तपारंपरिक उत्पादनाशिवाय इतर नविण्यापूर्ण उत्पादने नारळापासून तयार करणे आणि त्याद्वारे नारळ उद्योगाला चालना मिळून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे शक्य आहे. सचिन यांनी या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय संशोधनाबद्दल त्यांच्या कामाचे आंतर-राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधन या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संशोधकानी कौतुक केले आहे.

सचिन हा करंजी खुर्द (ता. निफाड) येथील प्रगतशील शेतकरी, माजी सरपंच श्री. रामदास आडसरे यांचा सुपुत्र यांने पुरस्काराचे नाव ‘ Springer-Nature Young Scientist Award” असे असून त्यांना हा पुरस्कार ” International Conference On Plant Bio-Factories” या आंतरराष्टीय परिषदे मध्ये प्रदान करण्यात आला .

यापूर्वीही त्यांनी इस्राएल येथे जून-जुलै-२०१९ दरम्यान संपन्न झालेल्या जागतिक अन्न सुरक्षा परिषदेमध्ये सहभागी झालेल्या ५ सदस्यीय भारतीय पथकाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यासाठी त्यांना इस्राएल सरकारतर्फे $४,३३५ डॉलरची PBC फेलोशिप आणि भारत सरकारची CSIR- Travel Grant ही प्रदान करण्यात आली. त्याद्वारे त्यांना इस्राईल ची आधुनिक शेती व तंत्रज्ञान, अन्न आणि कृषी प्रक्रिया उद्योगातील अविष्कार व त्यास प्रत्यक्ष भेट देण्याची संधी मिळाली. त्याचसोबत या परिषदेद्वारे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित शास्रज्ञ, उद्योजक आणि विचारवंत यांना ऐकण्याची आणि भेटण्याची संधी मिळाली. या दौऱ्या अंतर्गत त्यांना मुख्य सचिव, कृषी मंत्रालय, इस्राईल सरकार यांस भेटण्याची संधी मिळाली. त्यात त्यांनी भारत-इस्राईल दरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात असलेले महत्वपूर्ण असे माहिती देवाणघेवाण करार आणि त्याद्वारे भारतीय शेतकर्यांसाठी उपलब्ध असलेले संधी, त्याचबरोबर कृषी मंत्रालय, इस्राईल मार्फत भारतात स्थापन करण्यात आलेले संशोधन आणि तंत्रज्ञान हस्तांतरण केंद्रे याविषयी ही विस्तृत माहिती देण्यात आली.

सध्या सचिन हे अन्न अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभाग, रसायन तंत्रज्ञान संस्था (ICT Mumbai) येथे Ph. D. (Technology) करत असून त्यांचे ह्या विषयावरील संशोधन पत्र विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. सचिन यांचे प्राथमिक शिक्षण हे गावातीलच जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले आहे, तसेच माध्यमिक शिक्षण हे क. का. वाघ विद्याभवन, भाऊसाहेबनगर येथे झालेले आहे. ग्रामीण भागातील एक छोट्याश्या खेडेगावातून प्राथमिक शिक्षण ते PhD (Technology) पर्यंत चा प्रवास ह कौतुकास्पद आहे आणि आता संशोधनासाठी त्यांना मिळालेला युवा शास्त्रज्ञ पुरस्कार हि बाब उल्लेखनीय असून नाशिक जिल्ह्यासह संबंध उत्तर महाराष्ट्र साठी, त्यांच्या परिवासाठी व इष्टमित्रांसाठी अभिमानास्पद ठरली आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अभिनंदन

आमदार दिलीप काका बनकर प.स.सोमनाथ आबा पानगव्हाणे जि प सदस्या आम्रताई पवार मा सदस्य भाऊसाहेब भवर प.स सदस्य गुरुभाउ कांदे व आदी नी  अभिनंदन केले आहे

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *