Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपेन्शनच्या रकमेतून सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

पेन्शनच्या रकमेतून सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

वाजगाव । शुभानंद देवरे

राज्यासह संपूर्ण देशभरात करोना विषाणूचा प्रदुर्भाव दिवसेनदिवस वाढतांना दिसत आहे, रुग्णांच्या संख्ये वाढत होत असली तरी रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण तेवढेच मोठ्याप्रमाणात आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनाला मोठ्याप्रमाणात परिश्रम घेत रुग्णांची देखभाल करत करोनावर मात केली जात आहे.

- Advertisement -

करोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला अनुसरून गेल्या काही दिवसांपासून या निधीकडे आर्थिक मदत जमा करण्याचा ओघ चांगलाच सुरू झाला आहे.

मुख्यमंत्री यांच्या आवाहनास प्रतिसाद देत व देशांचे आपणाकडून काही देणे आहे या उदांत हेतूने वाजगाव ता.देवळा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.सुखदेव राघो देवरे यांनी आपल्या पेंशनच्या रक्कमेतील अकरा हजार रुपये रक्कमेचा धनादेश कोरोनाग्रस्थाच्या मदतीसाठी वाजगाव / वडाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिपक (बापू) देवरे, अमोल देवरे, देवळा शेतकरी संघाचे व्हा.चेअरमन संजय गायकवाड व तलाठी कुलदीप नरवडे यांचे हस्ते मा.मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देवळा येथील तहसीलदार दतात्रेय शेजूळ यांचेकडे जमा केला.

वाजगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुखदेव देवरे यांनी करोणाग्रास्थाच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अकरा हजार रुपयेचे अर्थसहाय्य दिल्याने देवरे यांची प्रेरणा घेत व आदर्श डोळ्यासमोर ठेवत गावातील किमान ४० हून अधिक नागरिकांनी गुगल पे, फोन पे आदींच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीत खात्यात राशी मदत म्हणून जमा केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या