Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

ट्रकसह प्रतिबंधीत गुटखा जप्त

Share
ट्रकसह प्रतिबंधीत गुटखा जप्त; Restricted Gutkha seized with truck

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या आदेश नुसार  तंबाखू  जन्य गुटखा चोरटी आयात करणऱ्यांं विरुद्ध छापे टाकण्याच्या  सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने सहायक पोलीस आयुक्त समीर शेख ( गुन्हे शाखा ) यांचे मार्गदर्शना खाली मिळालेल्या माहिती नुसार खेतवानी ला‍‍ॅ‍ॅन्स, उंट वाडी रोड , सिडको येथे सापळा रचून त्रिमुर्ती चौका कडे येणार ट्रक क्रमांक MH-04-HS-1444 ट्रक चालका कडे चौकशी केली असता ट्रक मधील  मालाचे चलन नसल्याचे आढळून आले

.सदर ट्रक चिखली गुजरात येथून लोड केल्याचे ट्रक चालकाने सांगितले, ट्रक मध्ये प्रतिबंधीत गुटख्याचे खोके व गोण्या आढळून आल्या. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी  ट्रक मधील मालाची खात्री केली असता वविध कंपनीचा एकून ४० लाख  रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा तसेच १५ लाख रुपये किमतीचा ट्रक असे ५५ लाख रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे .

सदर चे कामगिरी गुनेहे शाखा युनिट क्रमांग २ चे पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर , सहा पो.नि.गिरी, वसंत खतेले, पो.उ.नि.विजय लोंढे , पो. हवालदार युवराज पाटील, रमेश घाद्वाजे, राजाराम वाघ , श्रीराम सपकाळ , शंकर काळे , अन्सार सय्यद , देवकिसन गायकर यांनी केली आहे .

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!