Featured नाशिक

नाशिकचा रणसंग्राम : नवीन नाशिकमध्ये गोडसेंच्या प्रचारार्थ मोटारसायकल रॅली

नाशिक| प्रतिनिधी

शिवसेना-भाजपचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ शनिवारी नवीन नाशिक, अंबड भागात मोटारसायकल प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी खा. गोडसे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी यांचे औक्षण करुन शुभेच्छा दिल्या.

सकाळी नऊ वाजता निघालेल्या या प्रचार रॅलीत आमदार सिमाताई हिरे, सुधाकर बडगुजर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे लावलेल्या मोटारसायकली घेऊन सहभाग घेतला. सिडको विभागातील शिवाजी चौक, अंबड पोलीस ठाणे, गोविंदनगर, मोरवाडी, अंबड गाव, राणेनगर, पाथर्डी फाटा, खुटवटनगर आदी भागात ही रॅली काढण्यात आली.

यावेळी शिवाजी चुंभळे, कल्पनाताई पांडे, बंटी तिदमे, डी. जी. सुर्यवंशी, बाळासाहेब पाटील, जगन पाटील, किरण गामणे, किरण दराडे, कल्पानाताई चुंभळे, मुकेश शहाणे, कावेरी घुगे, पुष्पा आव्हाड, दिलीप दातीर, अलका अहिरे, दीपक दातीर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!