Type to search

Featured नाशिक

मतदान केंद्रावर रुग्णवाहिका न ठेवता, गरजेनुसार वैद्यकीय सेवा

Share
मुंबई | प्रतिनिधी
प्रत्येक मतदान केंद्रावर रुग्णवाहिका ठेवण्याची गरज नाही, अशी भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केली आहे. गरजेनुसार मतदान केंद्रांवर प्राथमिक उपचार साहित्य आणि रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध केली जाईल, अशी हमीही निवडणूक आयोगानं मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.
निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी करणारी जनहित याचिका वकील दिपक चट्टोपाध्याय यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.
निवडणूक आयोगाच्यावतीनं प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा पुरवली जाते. प्रसंगी संबंधित रुग्ण मतदार किंवा कर्मचार्‍याला तातडीनं रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध केली जाते, असं आयोगाच्यावतीने सांगण्यात आलं.
तसेच अगदीच तातडीची आवश्यकता असल्यास रुग्णवाहिकेऐवजी अन्य वाहनही तिथे उपलब्ध असतात, असं सांगण्यात आल्यानं याबाबत समाधान व्यक्त करुन हायकोर्टानं ही याचिका निकाली काढली.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!