नाशिक रणसंग्राम : उमेदवारांच्या प्रचार खर्च तपासणीचा पहिला टप्पा गुरुवारी

0
नाशिक |प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक अर्ज माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट झाले असून रिंगणातील उमेदवार प्रचाराला लागले आहे. निवडणूक आयोगाने यंदा उमेदवारांसाठी ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा निश्‍चित केली आहे. खर्चावर आयोगाची करडी नरज आहे.
त्या अनुषंगाने पहिली तपासणी येत्या गुरुवारी (दि.१८) सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात लेखा पथकासमोर होणार आहे. उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित रहावे, असे आवाहन निवडणूक शाखेने केले आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात १८ तर दिंडोरी मतदारसंघात ८ उमेदवार रिंगणात आहे. उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर राजकीय पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून धुमधडाक्यात प्रचाराला सुरुवात झाली आहे. पुढील काळात स्टार प्रचारकांच्या सभा रंगणार आहेत. शिवाय अगदी गल्ली बोळात शिरुन स्थानिक नेते व पदाधिकारी उमेदवारासाठी प्रचार करत आहे.
यंदा आयोगाने प्रचारासाठी ७० लाखांची मर्यादा दिली आहे. उमेदवारी अर्ज सादर करताना उमेदवाराचे खाते खोलण्यात आले आहे. उमेदवाराला प्रचारात वापरलेल्या झेंड्या, टोप्यांपासून ते कार्यकर्त्यांच्या नाश्ता, जेवणाचा खर्चाचा हिशेब द्यावा लागणार आहे.
उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक आयोगाचा वॉच असून मतदानापुर्वी तीन टप्प्यात खर्चाची तपासणी केली जाणार आहे. त्यानुसार पहिली तपासणी येत्या गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लेखा पथकासमोर होणार आहे.
तर, दुसरी तपासणी २२ व अंतिम तपासणी ही २६ एप्रिलला होणार आहे. उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी दैंनदिन खर्चाची नोंदवही, सर्व देयके, बँक पासबूक सोबत बाळगावे, अशी सूचना निवडणूक शाखेने केली आहे.

LEAVE A REPLY

*