नाशिकचा रणसंग्राम : राऊत, गोर्‍हे, बानगुडे यांच्या आज सभा

  0
  दे. कॅम्प | वार्ताहर
  शिवसेना, भाजपा, रिपाइं, रासपा व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज बुधवार दि. १७ रोजी शिवसेना नेते खा. संजय राऊत तसेच शिव व्याख्याते व कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
  सातपूर विभागात अशोकनगर येथील पोलीस चौकी मैदानावर सायंकाळी ५ वाजता तसेच नाशिकरोड येथे राजराजेश्‍वरी चौक, जेलरोड येथे सायं. ७ वा. जाहीर सभा होणार असून महायुतीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केले आहे.
  दरम्यान शिवसेनेच्या नेत्या निलम गोर्‍हे यांच्या प्रमुख उपस्थितीत गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात महायुतीच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा दुपारी ४ वाजता मेळाव्याचे आयोजन केेले आहे.
  सातपूर व नाशिकरोड येथील सभेस प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेना उपनेते बबनराव घोलप,जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भाजपाचे लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, वसंत गिते, आ. बाळासाहेब सानप,  महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, रासपाचे जिल्हाध्यक्ष अरुण आव्हाड, आ. राजाभाऊ वाजे, आ. सिमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. योगेश घोलप, शिवसेना महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
  या सभांना महायुतीचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन कोअर कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

  LEAVE A REPLY

  *