Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशिकच्या रंगपंचमीची ‘रहाड संस्कृती’ : दिल्लीदरवाजा चौक ‘रहाड’

Share

नाशिक | प्रतिनिधी 

गाडगेमहाराज पुलाजवळील दिल्ली दरवाजा चौकात असलेल्या पेशवेकालीन या रहाडीची देखभाल आणि मान समस्त तुरेवाले पंच मंडळ यांच्याकडे आहे. ही रहाड खोदण्यास सुरूवात झाली आहे.

शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या या रहाड परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी आझाद सिद्धेश्वर दिल्ली दरवाजा मित्र मंडळाची स्थापना स्वातंत्रपुर्व काळात झाली होती. तेव्हापासून या परिसरातील सर्व नागरीक व युवक या रहाडसाठी होळीपासूनच कार्यरत असतात. पळसाच्या फुलांपासून बनवला जाणारा नैसर्गिक रंग हे या रहाडचे वैशिष्ट आहे. या रहाडची १२ बाय १२ फुट रूंदी तर ६ फुट खोली आहे.

रंगपंमीच्या दिवशी येथील बेळे गुरुजी यांच्या घराण्याकडून विधिवत पूजा करून झाल्यावर ही रहाड सर्वांसाठी खुली केली जाते. या रहाडीचा आकार हा तुलनेने लहान असून त्या रहाडीपासून रंगपंचमीच्या दिवशी मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. या रहाडीचा रंग हा केशरी (लाल) ठरलेला असून त्यासाठी पळसाच्या फुलांचा उपयोग केला जातो.

दुपारी ३ वाजता सुरू होणार्‍या या रहाडीसाठी ७ ते ८० कार्यकर्ते कार्यरत असतात. रहाडीच्या चारही कोपर्‍यावर खाचा असून रंगात पडलेली व्यक्ती या खाचांच्या आधारे स्वत बाहेरपडू शकते. तरिही रहाडच्या पुर्व भागात मंडळाचे कार्यकर्ते रंगात उभे राहून बुडण्याची शक्यता असणारांना बाहेर खेचून काढतात. या रहाडमध्ये सरासरी २५ ते ३० हजार लोक दिवसभारत डुबकी लावून जातात. नैसर्गिक रंगामुळे कोणालाही कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. उलट त्वाचा विकार तसेच उन्हाळा बाधत नल्याचे सांगितले जाते.

असा बनतो रंग

या रहाडचा रंग लाला असून यासाठी पळसाच्या फुलांचा वापर केला जातो. यासाठी सुमारे ७० ते ८० किलो पळासाची फुले आदिवासी भागातून विकत आणली जातात. रंग पक्का बणण्यासाठी यामध्ये सुमारे गोणीभर मीठ घातले जाते. हे सर्व मिश्रणाच्या ४० कढई उकळून त्या रहाडमध्ये टाकल्या जातात.

वैशिष्ट्ये
* रंंग लाल
* रूंदी १२  बाय १२ फुट
* खोली ६ फुट
* नैसर्गिक रंग
* मध्यम आकार
* महिलांना ठराविक प्रवेश

पंच तुरेवालांची परंपरा
शहरातील इतर रहाडींप्रमाणेच तिवंधा चौक येथील रहाड ही पेशवे कालीन आहे. पेशव्यांच्या दरबारात कार्यरत असलेल्या येथील काही मंडळींना पंच तुरेवालाचा सन्मान मिळाल्याची अख्यायीका सांगितले जाते. ही रहाडीची देखभाल त्यांच्याकडे असल्याने येथील मंडळी अभिमानाने ही परंपरा जपत आहेत.
– शामराव ठाकुर

रंगपंचमी म्हणजे दिवाळी
तिवंधा चौकातील कुटुंबातील अनेक सदस्य तसेच कुटुंबिय बाहेरच्या शहरे तसेच राज्यात कामानिमित्त गेलेली आहेत. दिवाळीला एकवेळी येणार नाहीत. परंतु रंगपंचमी म्हटले की, सर्वजन पुन्हा नाशिकला दाखल होतात. होळी पासून रंगपंचमीपर्यंत सर्व मित्रपरिवार एकदिलाने रहाडसाठी कार्यरत असतात.
– सागर कुवर, कार्यकर्ता

 

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!