Type to search

ब्लॉकमुळे दोन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द

Featured maharashtra नाशिक

ब्लॉकमुळे दोन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द

Share

नाशिकरोड | प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या अप व डाऊन मार्गावर कल्याण आणि कसारा दरम्यान रेल्वेच्या कामासाठी दि. १९ रोजी सकाळी सव्वाअकरा ते दुपारी पावणेतीन दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दि. १८ व १९ मे रोजी काही रेल्वे गाड्या रद्द असून काही उशीरा धावतील.

पुणे-भुसावळ १९ रोजी पनवेल, कल्याणऐवजी दौंड, मनमाड वरून भुसावळला जाईल. ती नाशिकरोडमार्गे जाणार नाही.

रद्द झालेल्या रेल्वे गाड्या
भुसावळ-मुंबई पॅसेंजर १८ रोजी तर मुंबई-भुसावळ पॅसेंजर १९ रोजी रद्द राहील.

१९ रोजी मनमाड-एलटीटी-गोदावरी आणि एलटीटी-मनमाड गोदावरी एक्सप्रेस.

तसेच १९ मे रोजी मनमाड-मुंबई राज्यराणी आणि मुंबई-मनमाड राज्यराणी रद्द राहील.

रविवारी प्रस्थान स्थानकावरुन उशिरा सुटणार्‍या गाड्या

एलटीटी मुझफ्परपुर एक्सप्रेस १२.१५ ऐवजी १३.३० वाजता सुटेल.

मुंबई-हावड़ा एक्सप्रेस ११.०५ ऐवजी १५.०० वाजता,

एलटीटी गोरखपुर १०.५५ ऐवजी १४.३० वाजता,

एलटीटी गोरखपुर ११.१० ऐवजी १५.०० वाजता,

मुंबई-नागपूर हॉलिडे स्पेशल ११.३० ऐवजी १५.३५ वाजता सुटेल.

एलटीटी वाराणसी १२.४० ऐवजी १४.१० वाजता,

मुंबई-जबलपुर १३.३० ऐवजी १३.४५ वाजता,

मुंबई-अलाहाबाद हॉलिडे स्पेशल १६.४० ऐवजी दि. २० रोजी १२.२० वाजता,

जालना-दादर जनशताब्दी जालन्याहून सकाळी ०४.४५ ऐवजी ०७.४५ वाजता सुटेल.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!