Saturday, April 27, 2024
Homeनाशिक‘मानव विकास मिशन’ अंतर्गत गरोदर महिला, बालकांची तपासणी

‘मानव विकास मिशन’ अंतर्गत गरोदर महिला, बालकांची तपासणी

७५४ शिबिरांतून गरोदर महिला, बालकांची तपासणी

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

जिल्ह्यातील आठ आदिवासी तालुक्यात मानव विकास मिशन अंतर्गत माता व बालकांचे आरोग्य चांगले रहावे, कुपोषण नष्ट व्हावे व बालमृत्यूला आळा घालण्यासाठी ७५४ शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यात २० हजारांहून अधिक महिला, बालकांची तपासणी करण्यात आली. दरम्यान,यंदाच्या आर्थिक वर्षात ११८८ शिबिरे घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ७५४ शिबिरे जानेवारी अखेर पूर्ण झाली आहे. ४३४ शिबिरे अजून होणे बाकी आहे. ३१ मार्च अखेर ती पूर्ण करावयाची आहेत.

मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने मानव विकास कार्यक्रम राज्यातील १२५ तालुक्यांमध्ये सुरू केला. त्यात आरोग्य आणि शिक्षणावर विशेष लक्ष देण्यात आले. याप्रमाणे प्राधान्याने कुपोषित बालके, कमजोर माता, गरोदर महिला यांची परिपूर्ण तपासणी,त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करणे, त्यानुसार उपचाराची सुविधा करणे अशा सर्वच बाबींचा अंतर्भाव कऱण्यात आला आहे.

कुपोषणासह माता मृत्यू, बाल मृत्यूचे मागील काही दशकांतील वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी, त्यासाठी बालक, माता, गरोदर महिलांची तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्रांवर आरोग्य तपासणी शिबिरे घेण्याची योजना सुरु केली. एका शिबिरासाठी१८ हजार रुपये शासनाकडून खर्च केला जातो. त्यात डॉक्टरांचे ५ हजार रुपये मानधन, रुग्णांना केंद्रापर्यंत घेऊन येण्याची व्यवस्था, जेवणासाठी हे पैसे दिले जातात. या माध्यमातून संबंधित पीएससी आणि तालुक्यातील गरोदर महिलांची आरोग्य स्थिती, बाळांत महिलांची, त्यांच्या बालकांची आरोग्य स्थिती अशी परिपूर्ण माहिती ही आरोग्य विभागाकडे उपलब्ध होते. त्यानुसार पुढील योजना राबविण्यास मदत होते. मार्चअखेर पर्यंत ४३४ शिबिरे राबवावी लागणार आहेत.

१ कोटी २५ लाख खर्च
नाशिकमधील ८ तालुक्यांत आतापर्यंत झालेल्या शिबिरांवर १ कोटी २५ लाख १६ हजार खर्च झाला आहे. तरतूद १ कोटी ९६ लाख आणि ७४ हजार इतकी करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या