Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

पंतप्रधानांच्या सभेला जाताना ‘ही’ काळजी घ्याच; अन्यथा तुमचीही होऊ शकते पायपीट

Share

नाशिक । प्रतिनिधी

१ किलोमीटरची पायपीट, कडक तपासणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपोवनातील साधुग्राम येथे सभा होणार आहे. सभेसाठी उत्तर महाराष्ट्रातून सुमारे दिड ते दोन लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सभेसाठी येणार्‍या वाहनांसाठी वाहनतळांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. वाहनतळापासून सुमारे १ ते ३ किलोमीटरची नागरीकांना पायपीट करावी लागणार आहे.

तपोवन येथील साधुग्राम परिसरात गुरुवारी (दि.१९) दुपारी साडेबारावा वाजता पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शहरातील मार्गांवरील वाहतूकीत बदल केले आहेत. यासंदर्भात पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी अधिसुचना काढली आहे.

या निमित्त शहरातील वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील वाहतूक काट्या मारुती कडून उजव्या बाजुला वळून टकले नगर, कृष्णा नगर, तपोवन क्रॉसिंग रोडकडे जातील. तसेच संतोष टी पाँइट येथून उजवीकडे वाहतूक वळवून तपोवन क्रॉसिंगला डाव्या बाजुला वळून तपोवन रोडला जातील. तसेच लक्ष्मीनारायण लॉन्स समोरून चौफुली ओलांडून तपोवन रोडने कपिल संगमच्या पुढे वाहतूक नेता येईल. त्या ठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले आहे.

शहराबाहेर जाणार्‍या वाहतूक मार्गात बदल
मुंबई आग्रारोडने येणार्‍या लहान वाहनांना उड्डाणपुलावरून मुंबईच्या दिशेने जाता येईल. तसेच मुंबईच्या दिशेकडून येणारी लहान वाहने धुळ्याकडे जाताना पुलाखालून न जाता द्वारका रॅम्पवरून के. के. वाघ कॉलेज येथे उतरून धुळ्याच्या दिशेने जाऊ शकतील. तसेच मुंबईहून औरंगाबादच्या दिशेने जाणारी वाहने द्वारका मार्गे, बिटको चौक, जेलरोड, नांदुरनाका मार्गे औरंगाबादला जातील. सर्व प्रकारच्या जड वाहनांना शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांना पर्यायी मार्गाने शहराबाहेरून पुढे जाता येईल.

अशी आहेत वाहनतळे

शहरातील दुचाकींची व्यवस्थाः
दुचाकीवरून सभास्थळी जाणार्‍यांसाठी लक्ष्मीनारायण मंदिरासमोरून बुटुक हनुमान मंदिरासमोरील मोकळ्या जागेत दुचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

दिंडोरी रोड व पेठरोड कडून येणारे नागरिक  
पेठरोड व दिंडोरी रोडकडून नाशिककडे येणारी वाहतूक व सभेसाठी येणार्या नागरिकांना आरटीओ सिग्नल येथील डावीकडे वळण घेून रासबिहारी चौफुली येथून निलगिरी बागेतील सिद्धीविनायक लॉन्स समोर वाहने लावता येणार आहेत. या ठिकाणावरून पुढे त्यांना पायी जावे लागणार आहे.

मुंबईकडून येणारे  नागरिक
मुंबईकडून येणारी तसेच अंबड, भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सभेसाठी येणारी वाहतूक मुंबई आग्रा रोडने जुना मुंबईनाका, द्वारका सर्कल, टाकळीफाटा येथून तिग्रानिया कंपनी रोडने ट्रॅक्टर हाऊस समोरून काशिमाळी मंगल कार्यालयापासून गोदावरी घाट येथे जातील. त्या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून तपोवन नर्सरी रोडने सभास्थळी पायी जाता येईल.

पुणे बाजूकडून येणारे नागरिक
पुणेकडून येणारी वाहतूक नाशिकरोड उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूने खाली उतरून बिटको सिग्नल येथून उजव्या बाजुला वळवली आहे. तेथून जेलरोड दसक, नांदुरनाका सिग्नल, औरंगाबाद रोडने मिर्ची ढाबा सिग्नल येथून जेजुरकर मळ्यासमोरील मोकळ्या जागेत वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून औरंगाबद रोडने तपोवन नर्सरी रोडने पायी सभेच्या ठिकाणी जाता येणार आहे.

औरंगाबाद रोडने येणारे
औरंगाबाद रोडने येणारी वाहतूकीसाठी जनार्दन मठाजवळील इंद्रायणी लॉन्ससमोरील मोकळ्या जागेत वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून पायी सभास्थली जाता येईल.

धुळे कडून येणारे
धुळे, मालेगाव, चांदवड, ओझर मार्गे शहरात येणारी वाहतूक मुंबई आग्रा महामार्गावरील बळीमंदिरापासून डावीकडे वळून डाळिंब मार्केट येथे नेण्यात येईल. तेथे वाहनतळाची व्यवस्था असून तेथून सभास्थळी पायी जावे लागेल.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!