Thursday, April 25, 2024
Homeनाशिक२७७ महिलांना पिंक रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण

२७७ महिलांना पिंक रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण

नाशिक । प्रतिनिधी

महापालिका क्षेत्रातील ६० महिलांना पिंक रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण प्रायोगिक तत्त्वावर देण्याच्या महिला बालकल्याण समितीच्या निर्णयानंतर आलेले अर्ज लक्षात घेऊन आता २७७ महिलांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. यासाठी १८ लाख ९६४१ रुपयांच्या खर्चासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीने ४ सप्टेंबर २०१९ रोजी शहरात प्रायोगिक तत्त्वावर ६० महिलांना पिंक रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात ठराव केला होता. याकरिता महिला बाल कल्याण समितीने इच्छुक महिलांकडून अर्ज मागविले होते. यानुसार २८६ अर्ज प्राप्त झाल्यानंतर याची पडताळणी होऊन यात २७७ अर्जदार पात्र ठरले आहे.

यामुळे निधी उपलब्ध असतांना इतर महिला या प्रशिक्षणापासुन वंचीत राहू नये म्हणून स्थायी सभापती उद्धव निमसे यांनी प्रशिक्षणार्थी महिलांची संख्या वाढवावी आणि पात्र ठरलेल्या सर्व महिलांना प्रशिक्षण द्यावेत, अशी मागणी आयुक्तांकडे केली होती. यास आयुक्तांनी हिरवा कंदील दिल्यानंतर महिला बालकल्याण समितीने आता २७७ महिलांना पिंक रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेत यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेवर ठेवला आहे.

असा होणार प्रशिक्षणावर खर्च
पिंक रिक्षा प्रशिक्षणासाठी एका महिलेला ६ हजार ५३३ इतका खर्च येणार आहे. यात प्रशिक्षणार्थी महिलेला शिकाऊ अनुज्ञाप्ती शुल्क रु. २०१, पक्के अनुज्ञाप्ती शुल्क रु. ७६६. प्रशिक्षण शुल्क ४ हजार ८०० रु. लागणार आहे. पात्र ठरलेले २७७ अर्जदार महिलांना याप्रमाणे १८ लाख ९ हजार ६४१ रुपये इतका खर्च येणार आहे. हे प्रशिक्षण टप्प्या टप्प्याने दिले जाणार आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या